Friday, May 10, 2024

As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.

 As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.


मिहिर कोटेचा आता ‘खोटे’चा ठरल्याने किरीट सोमय्यांना पुढे आणावे लागले मात्र तेही फेकय्या असल्याचे मुलुंडकरांचे मत

 

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड मध्ये धारावीकरांचे पुर्नवसन करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी एकही भाजप नेत्याने या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. किरीट सोमय्या या विषयावर बोलायला तयार नव्हते. आता अचानक त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आपली बाजु मांडली. केवळ मराठी मतांसाठी किरीट सोमय्या यांनी या प्रकल्पाला विऱोध केला असल्याचे मुलुंडकरांचे म्हणणे आहे.

 

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर मुलुंड मध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. साखळी आंदोलन, साखळी उपोषण करुन मुलुंडकरांनी धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध केला होता. मात्र या दरम्यान एकही भाजप नेत्याने या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे सांगितले नव्हते. आता मात्र निवडणुक लागल्यानंतर आचारसंहिता चालू असताना केवळ दिखावा म्हणुन आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धारावी प्रकल्पाला विरोध केला. हि बाब लोक्याच्या लक्षात आल्यावर लोकांनी कोटेचा यांच्यावर विश्वास ठेवायचे सोडून दिले. कोटेचा कार्ड चालत नाही म्हणुन त्यांनी किरीट सोमय्यांना पुढे आणले. कारण गेले वर्षभर सोमय्या यांनी इतरांना जेल मध्ये टाकण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या. त्यावेळी त्यांनी एकदाही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला आपला विरोध असल्याचा उल्लेख केला नाही. आता मात्र त्यांना अचानक मुलुंडकरांची आठवण झाली. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विरोध असल्याचे जाहिर केले. मुळात भाजप मध्ये किरीट सोमय्या यांचे काहीच वजन राहिले नसून आता त्यांना कोणीच विचारत नाही. किमान राज्यसभा मिळेल अशी अपेक्षा सोमय्या होती. मात्र त्यांना तेही देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी बराच प्रयत्न केला. पण एका खाजगी वाहिणीने त्यांचे व्हिडीओ दाखवुन सोमय्या यांची बदनामी केली. त्यामुळे सोमय्या यांना लोकसभेचे तिकीट ही देण्यात आले नाही. आता चर्चेत राहायचे म्हणुन त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन धारावी प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. अशी माहिती अँड. सागर देवरे यांनी पत्रकारांना दिली. किरोट सोमय्या हे कोटेच्या सारखेच फेकय्या असल्याचे मुलुंडकरांनी सांगितले. आता यांनी काहीही केले तरी यांना मतदान करणार नसल्याचे मुलुंडकरांनी पत्रकारांना सांगितले.Kotecha again proved to be a 'lie', Mulundkar's decision not to vote for Kotecha

 कोटेचा पुन्हा ‘खोटे’चा ठरले, कोटेच्यांना मत देणार नसल्याचा मुलुंडकरांचा निर्णय
 

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड परिसरात टर्मिनस व क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन देणारे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी पुन्हा एकदा मुलुंडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहे. गेल्या पाच वर्षात आश्वासना शिवाय काहीच काम न करणा-या कोटेचा यांनी एकाच ठिकाणी दोन वेळा भुमीपुजन करुनही पाच वर्षात क्रीडा संकुल बांधले नाही. कोटेचा हे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देण्याच काम करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

दिवंगत आमदार सरदार तारासिंग यांनी मुलुंड मध्ये क्रीडा संकुल व्हावे म्हणुन पाच वर्षापुर्वी भुमिपुजन केले होते. त्यानंतर आमदार मिहिर कोटेचा यांनी त्याच जागेवर दुस-यांदा भुमिपुजन केले. मात्र पाच वर्षात त्यांनी काहीच काम केले नाही. गेल्या पाच वर्षांत कोटेचा यांनी विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासन देण्याचे काम केले. मुलुंड मध्ये वाहतुकीची मोठी समस्या असून त्यावर कोटेचा यांनी काहीच उपाययोजना केली नाही. हरिओमनगर मधील रहिवाश्यांना आजही टोल भरावा लागतो. त्याबाबत अनेकदा आंदोलन करुनही कोटेचा यांनी दुर्लक्ष केले. हरिओम नगर मधील रहिवाश्यांनी कोटेचा यांच्याशी अनेकदा पत्रव्यावहारही केला. मात्र कोटेचा यांनी आश्वासना शिवाय काहीच केले नाही. निवडणुका जवळ आल्यावर कोटेचा यांनी टोलचा प्रश्न लवकरच निकाली काढू येत्या पाच वर्षात क्रीडा संकुल व टर्मिनसचे काम सुरु करु असे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर मुलुंडकरांना दिले. मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने काहीच काम केले नाही ते आता काय करतील असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

तरुण मतदारांची भाजपकडे पाठ, मराठी गुजराती वाद निर्माण करणा-यांना मतदान नाही

Young voters turn their backs on BJP, Marathi Gujaratis don't vote for controversies


मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मराठी गुजराती असा वाद निर्माण करणा-या मिहिर कोटेचांना मतदान करणार नसल्याचा निर्णय ईशान्य मुंबईतील मराठी तरुणांनी घेतला आहे. केवळ मतांसाठी लोकांकडे जाणा-या कोटेचांना आता मतदारांनीच पाठ फिरवायला सुरवात केली आहे.


राज्यातील अनेक उद्योग गुजरात मध्ये नेणा-या भाजप सरकारने बेरोजगार मराठी तरुणांचा साधा विचारही केला नाही. महागाई
, बेरोजगारी वाढविण्याशिवाय भाजपने गेल्या दहा वर्षात काहीच काम केले नाही. आता निवडणुक आल्यावर भाजपला मराठी मतदारांची आठवण झाली. याच मराठी लोकांना गुजराती वस्ती असलेल्या ठिकाणी घर, दुकान नाकारण्यात आले. मुंबई सारख्या ठिकाणी शिवसैनिकांना इमारती मध्ये प्रवेश दिला नाही. अशा वेळी मतदान मागायला येणा-या मिहिर कोटेचा यांनी गेल्या पाच वर्षात काय केले असा प्रश्न विचारल्यावर कोटेचा संताप व्यक्त करतात. हा अनुभव अनेक तरुण मतदारांनी सांगितला. मराठी माणसांचा व्देष करणा-या भाजपला मतदान करणार नसल्याचा निर्णय ईशान्य मुंबईतील तरुण मतदारांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

Demand to suspend verified, official social media accounts of Mihir Korecha and BJP4Mumbai

महत्त्वाची बातमी

भाजपच्या सोशल मीडिया अकाउंट्स विरोधात संजय पाटील यांची निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि मुंबई भाजपचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट BJP4Mumbai यांच्यावर हिंदू विरुद्ध मुस्लिम, तसंच मराठी विरुद्ध गुजराती अशी तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे – महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मिहिर कोटेचा यांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरही निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित संबंधित सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद (suspend) करावीत अशीही मागणी संजय पाटील यांनी केली आहे. श्री. संजय पाटील यांचे संपूर्ण पत्र पुढीलप्रमाणे : 👇

 दिनांक ८ मे २०२४

 

प्रति,

मा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त,

निर्वाचन सदन, अशोक रोड,

नवी दिल्ली ११०००१,

 

मा. पोलीस आयुक्त,

पोलीस आयुक्तालय,

महात्मा फुले मंडई, फोर्ट,

मुंबई ४००००१

 

मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.

सामान्य प्रशासकीय इमारत, सहावा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०००३२

 

मा. निवडणूक निर्णय अधिकारी,

२८ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ,

महापालिका इमारत, विक्रोळी (पूर्व), मुंबई.

 

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

 

विषय : भारतीय जनता पक्षाचे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि BJP4Mumbai या सोशल मीडिया अकाउंट विरोधात खोटी माहिती पसरवणे, दोन समाजांत तेढ निर्माण करणे, कायदा-सुव्यवस्था बिघडवणे व इतर गंभीर कृत्यांबाबत तक्रार अर्ज.

 

महोदय,

 

मी, संजय दिना पाटील, शिवसेना - महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि BJP4Mumbai हे सोशल मीडिया अकाउंट यांच्याकडून काही अत्यंत आक्षेपार्ह, कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गोष्टी सातत्याने घडविल्या जात आहेत. सदर पत्राद्वारे मी आपणास कळवू इच्छितो की,

 

१) दिनांक ५ मे रोजी सायंकाळी उशिरा शिवसेनेची प्रचार पत्रके वाटण्यासाठी महविकास आघाडीचे काही कार्यकर्ते घाटकोपर पश्चिम येथील समर्पण या गुजरातीबहुल सोसायटीत जाऊ इच्छित होते. मात्र सोसायटीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना तिथे प्रवेश करण्यास मज्जाव केला. अखेर तिथे बाचाबाची झाली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याबाबतचे व्हिडिओ, बातम्या मी या पत्रासोबत देत आहे. [EXHIBIT-A]

 

२) दिनांक ४ मे रोजी उत्तर पूर्व मुंबईत माझ्याच नावाच्या ४ डमी उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले. या चारही उमेदवारांचे affidavit एकाच व्हेंडरकडून, एकाच दिवशी, एकाच व्यक्तीने, एकाच स्वाक्षरीने घेतले. याबाबत अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या चारही डमी उमेदवारांचे संबंधित affidavit मी सोबत जोडत आहे. या ४ डमी उमेदवारांपैकी २ जणांचे अर्ज पडताळणी प्रक्रियेत बाद झाले असले तरी आजही २ डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  [EXHIBIT-B]

 

३) दिनांक ३ मे रोजी प्रचार करत असताना मी स्वतः वृत्तवाहिन्यांशी बोलताना "आप मशाल का बटण दबाके उनको (द्वेषभावना पसरवणाऱ्यांना) खतम कीजिए"असं आवाहन केलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ४ मे रोजी भाजपच्या BJP4Mumbai या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक आणि X अकाऊंटवरून "उद्धव ठाकरे यांना मुंबईतून हिंदूंना संपवायचे आहे का?" असा सवाल उपस्थित करणारे ग्राफिक प्रकाशित करण्यात आले आहे. संबंधित पोस्ट आजही भाजपच्या या व्हेरीफाईड पेजवर उपलब्ध आहे. माझा आक्षेप आहे की, भाजपची अधिकृत सोशल मीडिया टीम माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. इतकंच नव्हे तर, आमचे आदरणीय नेते, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हिंदुद्वेष्टे म्हणून दाखवून त्यांची वैयक्तिक बदनामी करत आहे. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटचा वापर अगदी निर्लज्जपणे आणि उघडपणे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी केला जातोय. सोबत या मुद्द्याचे पुरावे सोबत जोडत आहे. [EXHIBIT-C]

 

४) सर्वात गंभीर बाब म्हणजे, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक ३० एप्रिल रोजी भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांनी एक व्हिडिओ स्वत:च्या फेसबुकवर पोस्ट केलाय, ज्यात ते म्हणतात की, "मी संजय पाटलांच्या टोपीवाल्या गुंडांना (म्हणजे मुसलमान नागरिकांना) ओपन चॅलेंज करतो की उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे. हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा, पाठीमागून नाही." तसंच, श्री. मिहिर कोटेचा यांनी कोणतेही कारण नसताना मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज नगरचा उल्लेख 'मिनी पाकिस्तान' असाही केला! संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ आजही त्यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजवर आहे. सोबत पुरावे जोडत आहे. [EXHIBIT-D]

 

५) दिनांक ३० एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारसभेवर "दगडफेक झाली नसून विटेचा तुकडा रॅलीच्या दिशेने आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत तक्रार नोंदवून घेत आहोत. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात येईल. याप्रकरणी अधिक चौकशी करत असल्याचे पोलीस उपायुक्त श्री. हेमराजसिंग राजपूत यांनी सांगितल्याची बातमी दैनिकात प्रकाशित झाली असून तीसुद्धा या पत्रासोबत जोडत आहे. [EXHIBIT-E]

 

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून मराठी विरुद्ध गुजराती हा वाद आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम यांच्यात वाद भडकून येथील शांतता भंग पावेल आणि दोन समाजांत तेढ निर्माण होईल असा प्रचार सातत्याने केला जात आहे. या संदर्भातील सर्व पुरावे मी या पत्रासोबत जोडत आहे.

 

माझी आपणास विनंती आहे की, भारतीय जनता पक्ष, त्यांचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि त्यांचे सर्व संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स यांविरोधात तसंच विशेषत: BJP4Mumbai या फेसबुक पेजवर आणि एक्स अकाउंटवर निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित ही सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद (suspend) करावेत. संबंधित सर्वांवर दोन समाजात तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून गुन्हा नोंद करावा, ही विनंती.

 

धन्यवाद.

 

आपला विश्वासू,

संजय दिना पाटील

अधिकृत उमेदवार,

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

Reflecting Reality Lok Sabha Candidates' Campaign Missteps Part 4

Final List of Mumbai North East District Lok Sabha Election Candidate's.
 

Wishing you abundance and prosperity on Akshaya Tritiya.


Wishing you abundance and prosperity on Akshaya Tritiya. May this auspicious occasion bring you joy and success that never fades. May your life be filled with health, wealth, and happiness on Akshaya Tritiya and always. Wishing you and your family endless blessings and positivity on this special day.


 

Popular Posts