Saturday, October 25, 2025

सिनियर सिटीजन कायदा फुस्कामी ठरला पोलीस व अधिकारी हाथ हलवत परत फिरले.

https://youtu.be/et3bBXPHpTQ

७० वर्षीय लीलाबाई पिपरिया यांना स्वतःच्या मुलांकडून फसवणूक – न्यायासाठी वृद्ध आईचा संघर्ष!” मुंबई, २४ ऑक्टोबर २०२५ : मुलुंड (प) येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्रीमती लीलाबाई नारायण पिपरिया या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वतःच्या मुलांकडून अन्याय, छळ आणि आर्थिक फसवणुकीला सामोऱ्या जात आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून मिळवलेली मालमत्ता – घरे व दुकाने – आज त्यांच्याकडून बळकावण्याचा प्रयत्न त्यांचेच दोन मुलगे आणि सुना करत आहेत. लीलाबाई यांनी १९९४ साली पतीच्या निधनानंतर सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेत आपल्या सहा मुलांना वाढवले आणि शिक्षण दिले. त्यांनी प्रामाणिक मेहनतीतून दोन घरे आणि दोन दुकाने विकत घेतली. मात्र आता त्या आपल्या पोटच्या मुलांकडूनच त्रस्त आहेत. हा प्रकार ज्येष्ठ नागरिक अत्याचार, फसवणूक, विश्वासघात आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याचे गंभीर गुन्हे म्हणून गणले जातात.

Popular Posts

सिनियर सिटीजन कायदा फुस्कामी ठरला पोलीस व अधिकारी हाथ हलवत परत फिरले.

https://youtu.be/et3bBXPHpTQ “ ७० वर्षीय लीलाबाई पिपरिया यांना स्वतःच्या मुलांकडून फसवणूक – न्यायासाठी वृद्ध आईचा संघर्ष!” मुंबई , २४ ऑक्टो...