Thursday, September 12, 2019

प्रसिद्धीसाठी मजकूर

पवई पोलीस ठाणेच्या हद्दीत पवई तलाव येथे गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पवई पोलीस ठाणे कडून आवाहन  करण्यात येते कि, चालू वर्षी मुंबई मेट्रोचे काम जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर चालू असल्याने रहदारी तसेच वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. पवई पोलीस ठाणे हद्दीतील पवार वाडी विसर्जन घाट या ठिकाणी देखील गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे व लवकरात लवकर पार पडणेकरिता या वर्षी सदर ठिकाणी दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच आगमन व निर्गमन करिता वेग वेगळे मार्ग तयार करण्यात आले आहेत, ला ब शा मार्गावरुन गांधी नगर मार्गे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरुन पवई कडे येथे येणारे सर्व गणपती पवार वाडी विसर्जन घाट या ठिकाणी विसर्जित करण्यात यावेत.
आपला विनम्र

अनिल पोफळे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पवई पोलीस ठाणे

Popular Posts

On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.

  On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.  His teachings  emphasize the importance of s...