'Dial 108' reaches milestone of more than one crore patient services In 10 years, 939 ambulances travel non-stop in the state
मुंबई : कुणी आजारी असेल, अपघात झाला किंवा वैद्यकीय सेवेची मदत आवश्यक असेल, तर तुम्ही १०८
क्रमांकावर कॉल करा; तुमच्या
सेवेत रुग्णवाहिका तयार. १० वर्षांत राज्यातील ९३७
रुग्णवाहिकांमधून एक कोटीपेक्षा अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. त्यातून
मुंबईला 91 रुग्णवाहिका आणि कुर्ला ते मुलुंड असे ३० रुग्णवाहिका सेवा देत
आहे, शहरी भागात विविध सुविधा असल्या तरी राज्यातील ग्रामीण
भागातील जनतेसाठी ही सेवा जीवनदायी अशी ठरली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या विद्यमाने
राज्यात मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती
घेतला होता. जानेवारी २०१४ मध्ये या सेवा प्रकल्पाचे काम पुणेस्थित भारत विकास
ग्रुप कंपनीकडे सोपविण्यात आले. राज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिकांमार्फत सेवेला
सुरुवात झाली. प्रकल्पास 'महाराष्ट्र
आपत्कालीन वैद्यकीय सेवा'
असे नाव देऊन राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाइल वा लॅण्डलाइन फोनवरून '१०८' हा क्रमांक डायल
करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत
रुग्णांना मोफत तथा वेळेत रुग्णवाहिका सेवा मागील दहा वर्षांपासून अविरत सुरू
आहे.
कोराना काळात ठरली जीवनदायी
रस्ते अपघात, हृदयविकार, गरोदर माता, इतर वैद्यकीय
कारणे या व अशा प्रकारच्या एकूण एक कोटी रुग्णांना सेवा देण्याची उपलब्धी या
प्रकल्पाने साध्य केली आहे. प्रकल्पातील रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय
अधिकारी तसेच रुग्णवाहिका चालक यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या या अविरत सेवेबद्दल
त्यांचे कौतुक होत आहे. सन २०२० च्या कोरोना काळात डायल १०८ रुग्णवाहिका
सर्वांसाठी जीवनदायी ठरली होती, हे विशेष.
जिल्हा प्रशासनांतर्गत पोलिस दल, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याबरोबर
सुयोग्य समन्वय साधत उद्भवणाऱ्या प्रत्येक आपत्तीप्रसंगी १०८ या रुग्णवाहिकेने
आपली रुग्णसेवा चोख बजावली.
रुग्णवाहिका २०१४ पासून सुरू आहे. एक कोटीपेक्षा अधिक विविध आजार, अपघातांच्या
रुग्णांना सेवा देण्याचा टप्पा या महत्त्वपूर्ण सेवेने गाठला आहे.
- डॉ. ज्ञानेश्वर
शेळके (मुख्य कार्यकारी अधिकारी), डॉ.
आशीष यादव (ज़ोन मेमेजर), डॉ. मोहित लाड (जिल्हा व्यवस्थापक), संजय वाघमारे (सहायक जिल्हा
व्यवस्थापक), नितिन माने (सहायक जिल्हा
व्यवस्थापक), राम कांटे (सहायक जिल्हा व्यवस्थापक), रविन्द्र माने (फ्लीट मेनेजर), १०८ रुग्णसेवा
जिल्हा समन्वयक, मुंबई.
Advertisement
MUMBAI : If someone is sick, has an accident or needs medical assistance, you should call 108; Ambulance ready at your service. In 10 years, more than one crore patients have been served by 937 ambulances in the state. Out of which 91 ambulances are serving Mumbai and 30 ambulances from Kurla to Mulund, although there are various facilities in urban areas, this service has proved to be vital for the people of the rural areas of the state.
An ambitious project to provide free ambulances in the state was undertaken under the auspices of the National Health Mission and the Ministry of Health and Family Welfare. In January 2014, the work of this service project was handed over to Pune-based Bharat Vikas Group Company. The service was started through a total of 937 ambulances in the state. Naming the project as 'Maharashtra Emergency Medical Services', dialing '108' from any location in the state from a mobile or landline phone will help in case of medical emergency.
Free and timely ambulance service to patients has been running continuously for the past ten years.
It became life-giving during the Korana period
The project has achieved a total of one crore patients for road accidents, heart disease, pregnant women, other medical reasons and so on. They are appreciating the continuous service provided by the medical officers and ambulance drivers working on the project ambulances. It is special that Dial 108 Ambulance was life saving for all during Corona period of 2020.
Excellent services like fire, police
108 Ambulance performed its patient care well in every disaster that occurred in proper coordination with the Police Force, Fire Force, District Disaster Management Department under the district administration.
Photo line
Ambulance is running since 2014. This important service has reached the milestone of serving more than one crore patients of various diseases, accidents.
- Dr. Dnyaneshwar Shelke (Chief Executive Officer), Dr. Ashish Yadav (Zone Mayor), Dr. Mohit Lad (District Manager), Sanjay Waghmare (Assistant District Manager), Nitin Mane (Assistant District Manager), Ram Kante (Assistant District Manager), Ravindra Mane (Fleet Manager), 108 Patient Care District Coordinator, Mumbai.