A Lesson of Judiciary in Chhatrapati Shivaji
Maharaj's Era: Kene family of Devrung Bhiwandi sent a poignant message against
rape through the film 'Chowrang Shiksha' at their home Ganeshotsav.
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायव्यवस्थेचा धडा : देवरूंग भिवंडीतील केणे कुटुंब ह्यांनी घरगुती गणेशोत्सवात ‘चौरंग शिक्षा’ चलचित्राद्वारे बलात्कार विरोधात
मार्मिक संदेश
ठाणे, भिवंडीच्या देवरुंग
येथील घरगुति गणेशोत्सवात केणे कुटुंब ह्यांनी यंदा एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक संदेश
देणारे चलचित्र सादर करण्यात आले. वाढत्या बलात्कारी घटनांवर आणि आरोपींना होत असलेल्या
अल्प दंडावर प्रखर प्रकाश टाकत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
काळात अशा गुन्ह्यांसाठी दिली जाणारी कठोर शिक्षा या विषयावर आधारित ‘चौरंग शिक्षा’
हे चलचित्र प्रेक्षकांना भावले.
या चलचित्रातून
दाखवले की,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात न्यायव्यवस्थेत बलात्कारासारख्या
गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा दिली जात असे. हा संदेश आजच्या काळातही
महत्वाचा असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने या संदेशाचा विचार
करून, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी, असे आयोजकांचे मत होते.
समाजातील
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या चलचित्राने प्रभावी भूमिका निभावली असून, ‘चौरंग शिक्षा’
हा व्हिडीओ जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून त्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे. "जर तुम्ही साहेमंत असाल, तर हा व्हिडीओ जास्तीत
जास्त लोकांना फॉरवर्ड करा," असेही आयोजकांनी आवर्जून सांगितले.
Full video of
making
https://youtube.com/watch?v=6lXjMnfJz4s&feature=shared