मुंबई आणि ठाण्यातल्या इतर भागांत प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर जेनेरिक
औषधांचे 13 वे स्टोअर आयआयटी
मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी राजावाडी, घाटकोपर पूर्व येथे सुरू केले
आहे. याचबरोबर अंधेरी-महाकाली, कुर्ला पूर्व, कळवा पश्चिम, ठाणे-कोलशेत
आणि विक्रोळी पूर्व-टागोर नगर मध्ये लवकरच स्टोअर सुरू केले जाणार आहे. 19 ऑगस्ट 2018 रोजी घाटकोपरच्या राजावाडी परिसरात जेनेरिको औषधांच्या स्टोअरचे उदघाटन महाराष्ट्राचे गृहनिर्माण
मंत्री प्रकाश मेहता यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रूग्णांना उपचारामध्ये परवडणारी औषधे मिळावी यासाठी
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जेनेरिक मेडिकल सुरू करण्याची योजना सुरू
केले. रूग्णांसाठी ही फायदेशीर गोष्ट ठरली आहे. जेनेरिक औषधांचा जास्तीत जास्त लाभ
लोकांनी घेतला पाहिजे असे मत गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी
व्यक्त केले. तसेच ह्या प्रसंगी गिरीश अगरवाल व सिद्धार्थ गादिया यांना सर्वसामान्य
जनतेस परवडणाऱ्या औषधालय उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले. जेनेरिक औषधांमुळे
रुग्णांच्या औषधांच्या किंमतीत 15 ते 80 टक्के बचत होते. या स्टोअरमधून
दर्जेदार कंपन्याच्या जेनेरिक औषधांबरोबर 15 टक्के सूटवर दिली जाते. या स्टोअरमधून
वितरित केली जाणारी जेनेरिक औषधे ही मान्यताप्राप्त अग्रणी फार्मा कंपन्यांमधून
मिळवली जातात आणि जेनेरिको स्टोअरमध्ये योग्य रसायनशास्त्रज्ञांकडून शिफारस केली
जातात. जीवनदायी औषधे 50 टक्के सवलतीत विकली जातात त्यामुळे मधुमेह
त्यांच्या मासिक बिलांच्या 40 ते 50 टक्के बचत करू शकतात. तसेच मधुमेहाच्या
तपासणीच्या उपकरणातही बचत होते.
राजावाडीच्या
रहिवाशांसाठी एक विशेष जेनेरिको
स्टोअरने स्थानिक नंबर
(9326 364 785) जारी केला असून त्याद्वारे रुग्ण त्यांच्या डॉक्टरांनी किंवा
डॉक्टरांशी संबंधित काही शंका किंवा जेनेरिक औषधे ऑर्डर करू शकतात आणि औषधांबद्दल
प्रश्न विचारू शकतात.
गेल्या 14 महिन्यात जेनेरिको यांनी मुंबई आणि ठाणे रहिवाशांना गुणवत्तापूर्ण स्वस्त दरात औषधे देण्याकरिता
काम केले आहे. जेनेरिकोने आतापर्यंत मागील 14 महिन्यांत 75,000 पेक्षा जास्त
रूग्णांच्या औषधांच्या किंमतीत 7 कोटींची बचत केली आहे. महाग औषधांकरिता
गुणवत्ता आणि परवडणारी पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये जेनेरिक औषधांना
मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. रुग्णांसाठी योग्य किंमतीवर दर्जेदार औषधे
पुरविण्यासाठी या सामाजिक चळवळीचा भाग व्हावा यासाठी जेनेरिकोचा हेतू आहे.