रेशन दुकानावर धाड. अवैध धन्यसाठा जप्त
मुंबई, 9 डिसेंबर 2019:
सरकारमान्य स्वस्त धन्य दुकानात चालत असलेला काळाबाजार आज
पुन्हा एकदा उघड झाला. मुलुंड पश्चिमेकडील वैशाली नगर येथे सार्वजनिक वितरण
विभागाच्या अधिकार्यांनी स्वस्त धन्य दुकानात धड घालून 35 क्विंटल
तांदळाचा अवैध साठा जप्त केला.
प्राप्त माहिती नुसार, बालराजेश्वर
नगर, वैशाली नगर, मुलुंड पश्चिम येथे
स्वस्त धन्य दुकान क्रमांक 29 ते 35 येथे अवैध कारभार सुरू असल्याची तक्रार विभागास प्राप्त
झाली होती. त्यानुसार विशेष पथकाने आज धड घालून 35 क्विंटल तांदळाचा
अवैध साठा जप्त केला. ह्या दुकानाचा परवाना प्रभावती मारू यांच्या नवे असून, शीतल पलांडे हे दुकान चालवत होत्या. ह्या प्रकरणी तपास सुरू
असून, तो पूर्ण झाल्यावर
पुढील कारवाई करण्यात येईल.