Thursday, August 8, 2024

Mulund Police Station Returns 140 Mobile Phones to Their Original Users

मुलुंड पोलिस स्टेशन ने 140 मोबाईल फोन मूळ वापरकर्त्यांना परत दिले
मुलुंड पोलिस स्टेशनने एक अद्वितीय कारवाईत आपल्या हद्दीत चोरी आणि हरवलेले मोबाईल फोन शोधून ते पुन्हा मिळविण्यासाठी एक विशेष मोहीम राबविली. अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्स्टेबल्सच्या समर्पित प्रयत्नांमुळे, मानवी बुद्धिमत्ता आणि गुप्त माहितीचा वापर करून एकूण 140 मोबाईल फोन परत मिळवण्यात आले, ज्यांची एकूण किंमत ₹14,00,000 आहे. मुलुंड पोलिस स्टेशन, मुंबईने हे परत मिळवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ वापरकर्त्यांना परत दिले. नागरिकांनी आपले हरवलेले फोन परत मिळाल्यावर आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.
Mulund Police Station Returns 140 Mobile Phones to Their Original Users
In a unique operation, Mulund Police Station launched a special campaign to locate and recover stolen and lost mobile phones within its jurisdiction. Through the dedicated efforts of officers and constables, and by utilizing human intelligence and confidential information, a total of 140 mobile phones were recovered, valued at ₹14,00,000. Mulund Police Station, Mumbai, returned these recovered mobile phones to their original users. Citizens expressed their joy and gratitude upon receiving their lost phones back.
#mulundpolice Mulund Police Friends

मुलुंड पश्चिममध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम संपन्न

मुलुंड पश्चिम येथील एम.जी. रोड शाखा क्रमांक १०४, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भगवा सप्ताह निमित्त गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख श्री. राजेश साळी यांनी केले होते.
या कार्यक्रमास भांडुप चे आमदार श्री. रमेश कोरगांवकर, उपनेते श्री. दत्ताजी दळवी, महिला विभाग संघटीका सौ. राजराजेश्वरी रेडकर, युवासेना कार्यकारीणी सदस्य राजोल पाटील, उपविभागप्रमुख श्री. सिताराम खांडेकर, आणि श्री. दिनेश जाधव, विधानसभा संघटक श्री. संजय माळी, उपविभाग संघटीका श्रीमती. हेमलता सुकाळे, मुलुंड विधानसभा संघटीका सौ. नंदिनी सावंत, शाखा संघटीका श्रीमती. गिता साळवी, समन्वयक श्री. चंदु घडशी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख श्री. सागर घोडे, उपशाखाप्रमुख विजय आव्हाड, अशोक पडोळ, हितेश ठक्कर, संजय सावंत, तुषार शिंदे, सुरेश चव्हाण, राज ठाकरे, दत्ता चपटे, राजु दाते यांसह अनेक शिवसैनिकांनी मेहनत घेतली.



Popular Posts

Public Toilets: A P-and-U Rip-off in the City of Gold? A Human Cost to a Civic Crime

https://youtu.be/hu8oBJ5mDl4 Mumbai 21 st August 2025 : The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has long held up its public toilet ne...