Thursday, August 8, 2024

मुलुंड पश्चिममध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम संपन्न

मुलुंड पश्चिम येथील एम.जी. रोड शाखा क्रमांक १०४, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भगवा सप्ताह निमित्त गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख श्री. राजेश साळी यांनी केले होते.
या कार्यक्रमास भांडुप चे आमदार श्री. रमेश कोरगांवकर, उपनेते श्री. दत्ताजी दळवी, महिला विभाग संघटीका सौ. राजराजेश्वरी रेडकर, युवासेना कार्यकारीणी सदस्य राजोल पाटील, उपविभागप्रमुख श्री. सिताराम खांडेकर, आणि श्री. दिनेश जाधव, विधानसभा संघटक श्री. संजय माळी, उपविभाग संघटीका श्रीमती. हेमलता सुकाळे, मुलुंड विधानसभा संघटीका सौ. नंदिनी सावंत, शाखा संघटीका श्रीमती. गिता साळवी, समन्वयक श्री. चंदु घडशी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख श्री. सागर घोडे, उपशाखाप्रमुख विजय आव्हाड, अशोक पडोळ, हितेश ठक्कर, संजय सावंत, तुषार शिंदे, सुरेश चव्हाण, राज ठाकरे, दत्ता चपटे, राजु दाते यांसह अनेक शिवसैनिकांनी मेहनत घेतली.



No comments:

Popular Posts