Monday, July 25, 2016

मुलुंडच्या किशोरांचे पोकीमॅनसाठी‘पॉकी वॉक’

मुलुंड

अमेरिकेत व्हायरल झालेल्या पोकी वॉकचे लोण दादर, पवई, बांद्रा, अंधेरीनंतर आता मुंबईच्या पूर्व उपनगरात पसरू लागले आहे. पोकीमॉनच्या शोधात आज मुलुंड पश्चिम येथे 150 किशोरवयीन मुलांनी पोकीमॉनला पकडण्यासाठी पॉकी वॉक केले. विशेष म्हणजे या मुलांना सुरक्षित चालता यावे याकरीता आयोजकांच्या माता-पित्यांनी त्यांना साथ दिली.

कार्टून जगतातील पोकीमॉन हे सुप्रसिद्ध पात्र लहान मुलांचे अतिशय आवडते आहे. मुलुंडमधील हर्ष मालिया, शुभ शहा, यश पांचाळ, व्योम रायचना हे चौघे पोकीमॉन

फॅन मित्र 19 वर्षीय युवक एकत्र आले. पोकीमॉन बद्दल लहानपणापासून अंत्यत जिव्हाळा असल्याने त्यांना इतर ठिकाणी  चालणाऱ्या पोकीमॉनच्या चळवळीविषयी कळल्यावर या चौघांनी ‘फोर हॉर्समॅन’ हा ग्रुप स्थापन करून त्याची एक वेबसाईट बनवली. त्यावर 250 लोकांनी नोंदणी केल्याचे हर्ष मालिया यांने सांगितले.

आज या ग्रुपवर नोंदणी केलेल्यापैकी 150 जणांनी एलबीएस मार्गावरील निर्मल लाईफ स्टाईलपासून पोकी वॉकला पोकीमॉनप्रेमींनी त्याला पकडण्यासाठी सुरवात केली. त्यांनतर हे पोकी वॉक योगी हिल जवळील सायप्रस सोसायटीजवळ समाप्त झाले. विशेष म्हणजे अतिशय शिस्तीत कोणताही घटना घडू नये याची काळजी चारही आयोजकांच्या पालकांनी उपस्थित राहून घेतली त्याकरीता त्यांनी रस्त्याच्या कडेने दोरी धरण्याचे काम केले. पाच दिवसात आयोजन करण्यात आलेल्या या पोकी वॉकला  मुलुंडमधील रश्मी ट्रेडर्स आणि द क्राफ्ट लॅंड, केक लेन यांनी सहकार्य केल्याचे आयोजकांनी सांगितले.

Popular Posts

Shop for Rent – Mulund West (Prime Location)

Location Highlights: Road-facing shop in a newly constructed building In a famous society, right next to Apna Bazar & Maharashtra Se...