ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा होतोय मनःस्ताप
लसीकरणासाठी ऑनलाइन
नोंदणीची बोंबाबोंब अजून संपलेली
नाही. याबाबतीत सर्वसामान्य नागरिक वैतागून गेलेले आहेत. पण त्याचबरोबर ज्येष्ठ
नागरिकांना थेट लस घेण्याची सुविधा मिळवताना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी न करता थेट लसीकरणाचा
पर्याय देण्यात आला. त्यामुळे मुलुंड सर्वच कोविड लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच
ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक रांग लावतात. मात्र लस
घेण्यासाठी गेटवर टोकन घेण्यासाठी, नोंदणी करणे, नंतर प्रत्यक्ष
लस घेताना अशा तीन वेळा रांग लावावी लागते. या रांगामधे सामाजिक अंतरचा पुरता
फज्जा उडालेला दिसतो.