Tuesday, December 11, 2018

टी विभागाचा अजब गजब कारभार !


मुलुंड पश्चिम येथील मनपा टी विभाग  कार्यालयापासून जेमतेम शंभर मीटरच्या अंतरावर 100 असलेल्या बिलेश्वर महादेव मंदिरासमोरील पदपथाखाली असलेल्या गटाराचे ढाकण कित्येक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुटलेल्या ढाकणाबाबत मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता तातडीचा उपाय म्हणून त्याच तुटलेल्या ढाकणावर अजून एक तूटलेल्या ढाकण टाकण्यात आले आहे.


एखादी घटना घडल्यानंतरच टी विभाग मनपा प्रशासनास जाग येणार आहे असे वाटतंय!


काय म्हणावे मनपाच्या या गंभीर थुकपट्टी कामाला..?

Popular Posts