Wednesday, March 10, 2021

जागतिक महिला दिनी महिला पोलीसांशी डॉक्टरांचा आरोग्य संवाद!


मुलुंड : ८ मार्च २०२१ : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य विषयी एक परिसंवाद  पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ अंतर्गत चंदन बाग हॉल मुलुंड पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता.  हिरानंदानी हॉस्पिटलच्या प्रसूति आणि  स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. राखी साहू या प्रमुख वक्त्या होत्या.

डॉ. राखी साहू यांनी स्त्री रोगाबद्दल कस जागरूक रहायच व काळजी घ्यायची त्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती जुबेदा शेख, यांनी एक स्त्री शक्तीचे उदाहरण देतांना चिन्धी नावाच्या मुलीची  गोष्ट सांगितली आणि महिलांना प्रोत्साहित केले. तसेच शुभदा चव्हाण यांनी सुद्धा अनेक स्त्री शक्तीच्या गोष्टीमांडून स्त्रियांना सक्षम व्हावे असे सांगितले.

 कार्यक्रमात श्री रमेश ढसाळ व. पो. नि., मुलुंड पोलीस ठाणे, शुभदा चव्हाण, व. पो. नि., विक्रोळी पोलीस ठाणे तसेच श्रीमती जुबेदा शेख, व. पो. नि., पार्कसाईट पोलीस ठाणे, ए.एस.आई. विष्णू मालवे, मिल स्पेशल मुलुंड पोलीस ठाणे, मुलुंड न्यायालयाचे सरकारी वकील, राजेश्री विर्कुट व मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ च्या विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महिला अधिकारी, अंमलदार व शिपाही तसेच ट्राफिक पोलीसमधून ही महिला अंमलदार तसेच अग्निशामक दलाचे महिला अधिकारी उपस्थित होते.


Popular Posts