ईशान्य मुंबईतील मुलुंड, भांडूप पाठोपाठ घाटकोपरमधील व्यापारी संघटनांनी संजय दिना पाटील यांना दिला जाहीर पाठिंबा
ईशान्य मुंबई - 22 एप्रिल 2019 :
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात मध्ये तेव्हा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी कामकाज पाहत होते. तेच पुढे देशाचे पंतप्रधान म्हणून भाजपाने निवडणुका लागण्यापूर्वीच सहा महिने अगोदर घोषित केल्याने गुजराती, जैन, मारवाडी समाज खूप खुश होता. गुजराती समाजाचा दृष्टिकोन फक्त एकच होता ते म्हणजे नरेंद्र मोदी गुजराती आहेत व गुजराती माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे. सहाजिकच आपल्या समाजाचा एक प्रधानमंत्री होतोय हे प्रत्येकाला गौरवाचे असते. पण त्याच गुजराती, मारवाडी, जैन समाजाची आज निराशा झाली आहे. या नरेंद्र मोदींनी केवळ ते ‘गुजराती’ आहेत म्हणून देशभरातील गुजराती, जैन, मारवाडी, राजस्थानी या समाजाने एकत्र येऊन शंभर टक्के मतदार मतदाराला घराघरातून बाहेर काढून मोदींसाठी मताचे दान केले, पण त्याच मोदींनी देशातील जनतेबरोबर या व्यापारी वर्गाला ही देशोधडीला लावले अशी भावना गुजराती, जैन, मारवाडी या वर्गात आहे. कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते चरण सिंग सप्रा व उमेदवार संजय दिना पाटील यानी सदिच्छा भेट घेवून व्यापारी वर्गाच्या व्यथा समजून घेतल्या.
ईशान्य मुंबईतील गुजराती, मारवाडी, जैन, राजस्थानी मतदारांची संख्या १,८१,४१६ असून हा समाज प्रामुख्याने सर्वाधिक मुलुंड, घाटकोपर भागात आहे. त्या-त्या भागात त्यांच्या व्यापारी संघटना आहेत. ज्वेलर्स व्यापारी संघटनेने याबाबत पुढाकार घेऊन ईशान्य मुंबईत भांडी व्यापारी संघटना, मेडिकल स्टोअर्स संघटना, कपडा व्यापारी संघटना अशा लहान-मोठ्या असलेल्या सर्व व्यापारी संघटनांना एकत्र करण्याचे काम अखिल भांडुप व्यापारी असोसिएशनने केले असून अखिल भांडुप व्यापारी असोशिएशनचे ज्वेलर्स व्यापारी देवेंद्र कोठारी, रतनजी हिरण, डालचंदजी कोठारी, बाबुलालजी कोठारी, प्रकाश सूर्या, उत्तमजि जैन, प्रवीण जैन, जयेश जैन, मुकेश कोठारी, सुरेश चपलोर, भट्टीपाडा व्यापारी असोसिएशन, मेवाड भवन, जैन राजस्थानी वर्धमान स्थानकवासी समाज, श्री जैन मंदिर समाज, तेरापंथी सभा मुलुंडचे अध्यक्ष राकेश ठुकलीया, जैन तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष श्री. निर्मलजि धिंगा, ज्वेलर्स असोशिएशनचे चुन्नीलाल सिंगवी, प्रकाशजी गेलडा, महेंद्रजी सांखला, श्री विनोद, श्री सांखला, श्री प्रकाशचंद बगरेया, प्रकाशजी सूर्या, राकेशजी सूर्या, सुनील इतेदिया, गोल्डन ग्रुपचे सिंघवी, प्रकाश कोठारी, कपडा व्यापारी असोसिएशनचे सी. जितेंद्र मेहता, भरत मेहता, जेवेलचंद मेहता, भरत मेहता, सुनील ग्रुपचे प्रफुल जैन, राजेश जैन, राजस्थान गुजरात जैन समाजचे व्यापारी असोसिएशन जैन श्र्वेतांबर तेरापंथी सभेचे पदाधिकारी राकेश टुकलिया, चुन्नीलाल शिंगवी, भांडूप ज्वेलर्स कपडे व्यापारी यांनी एकत्र होऊन आज बैठक घेतली व व्यापारी वर्गाच्या विविध समस्या, अडचणीवर चर्चा केली. व्यापारी वर्गाच्या समस्या, अडचणीवर अधिक चर्चा केल्यानंतर काही महिनेच ज्वेलर्स व्यापारी वर्गाला प्रचंड प्रमाणात राज्य सरकारने अधिकाऱ्यांमार्फत त्रास दिला. नोटाबंदी नंतर सर्व व्यापारी वर्गाचा व्यवसाय निम्म्यावर आलेला आहे. पन्नास टक्केपेक्षा अधिक व्यापारीवर्गाने आपले पिढ्यान पिढ्या सुरू असलेले व्यवसाय धंदे बंद केले. जीएसटीमुळे व्यापारी वर्गाला झालेला त्रास व मुंबईतून व्यापारी वर्गाची शिष्टमंडळ दिल्लीला गेले तेव्हा झालेला त्रास सरकारमधील मंत्री, भाजप पदाधिकारी व अधिकाऱ्याने व्यापारी वर्गाची केलेले मानहानी याबाबत सविस्तर चर्चा व्यापारीवर्गाने केली.
घाटकोपर विद्याविहार मधील व्यापारी वर्गाने लवेकर बाग, स्वामीनारायण मंदिर येथे रविवार दिनांक २१ रोजी सर्व व्यापारी वर्गाची सभा लावली होती. या सभेत व्यापारी संघटना, कपडा व्यापारी संघटना, मेडिकल स्टोर संघटना, प्लाईवूड व्यापारी संघटना, हार्डवेअर व्यापारी संघटना, स्टील व्यापारी संघटना, बिल्डिंग मटेरियल व्यापारी संघटना सामील झाल्या होत्या. श्री केतन शहा, श्री सुरेश राठोड, श्री लक्ष्मण कोठारी, श्री नारायण राजपुरोहित, मुलुंड तेरापंथी समाजचे सदस्य चुन्नीलाल सिंघवी, प्रकाश बग्रेचा, सुनील जैन, राकेश तुकलिया, जितु महेता, बन्सीलाल जैन, सुमित ग्रुपचे प्रफुल्ल जैन, ललित जैन, राजेश जैन उपस्थित होते.
मोदी सरकार हिटलरशाही पेक्षा अधिक जुलूम करत असल्याने व आमचे धंदे बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. मोदी सरकार पुन्हा आले तर आम्ही देशोधडीला लागू व ज्या गावातून आलो तेथेच पुन्हा जावे लागेल. त्यापेक्षा पूर्वीचे सरकार बरे होते. आम्ही गुजराती, जैन, मारवाडी, असलो तरी या मुंबईत, ईशान्य मुंबईत आमच्या अनेक पिढ्या राहिल्या. व्यवसाय केला. पण गेल्या पन्नास वर्षात कधीच त्रास आम्हाला झाला नाही तो त्रास गेल्या पाच वर्षात मोदींनी आम्हाला दिला आहे. सरकारकडे कोणतीही योजना नाही फक्त पैसे भरा व आमच्या पैशातून स्वतःसाठी जाहिरात करा. एवढेच काम मोदींनी केले. मुंबईतील मराठी माणसांनी आमचा धंदा वाढवला. आमच्या मागील ५० वर्षांपूर्वीच्या पिढ्या व आमची मुले या मराठी माणसांच्या जीवावर ‘मैत्री’ करून मोठी झाली. त्याच मराठी माणसाच्या जीवावर आमचा व्यवसाय वाढला. त्या मराठी माणसाला निवडून देण्याचा संकल्प आम्ही सर्व वर्गाने केला आहे. आमच्या जातीच्या माणसानी माती खाल्ली. पण या ईशान्य मुंबईतील मराठी माणसांनी आम्हाला जगवल... मराठी माणसे म्हणजे जीवाला जीव देणारे... व प्रामाणिक माणसे... त्यामुले काही हि झाले तरी या वेळेला एका मराठी माणसाचे उपकार आमही विसरणार नाही. आमचा संपूर्ण समाज येणाऱ्या २९ तारखेला योग्य तो न्याय देईल... व परिवर्तन घडवून आणेल.