Monday, July 26, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला साखर वाटपाचा कार्यक्रम

मुलुंड शिवसेना शाखा क्र.१०४ च्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच नवनियुक्त मुलुंड विभाग संघटक संजय माळी यांनी ५०० जणांना साखर वाटप केले. यावेळी शाखा क्र. १०४ चे नवनियुक्त शाखाप्रमुख राजेश साळी, उपविभाग प्रमुख सीतारा खांडेकर, उपविभाग संघटीका शितल पालांडे, माजी नगरसेविका हेमलता सुकाळे, विधानसभा संघटक जगदीश शेट्टी, शाखा संघटीका गीता साळवी, शाखा समन्वयक चंदू  घडशी, युवा सेना शाखा अधिकारी जयवंत जाधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशाखा प्रमुख, गटप्रमुख व शिवसैनिकांनी मेहनत घेतली. 

Popular Posts