Sunday, May 14, 2023

गुजरातेत शिवाजी महाराजांचे सामूहिक पूजन!

गुजरात, अहमदाबाद येथील वसंत चौक, भद्रा, लाल दरवाजा येथे मराठी एकत्रीकरण समूह नियमितपणे दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे सामूहिक पूजन आणि आरतीचा कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमात केवळ मराठीच नव्हे तर गुजराथी तसेच इतर भाषक लोक सहभागी होतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रचीत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती यावेळी म्हटली जाते.

Popular Posts