Friday, October 7, 2022

सेवा नगर चेंबूर येथे नासीर हुसैनवर विकासकाच्या माणसाने केला हल्ला


चेंबूर सेवा नगरला लागून CTS नं. ३६८ व ३६९ वर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बऱ्याच अनियमितता आहेत, आज सकाळीच आम्हाला तक्रार मिळाली आणि आम्ही त्या समस्या जाणून घेण्याकरिता सेवा नगरच्या रहिवाशांना भेटलो, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. दर्शन प्रॉपर्टी नावाच्या विकासकाने सेवा नगरच्या शेजारच्या दोन झोपडपट्ट्या पुनर्विकासासाठी घेतल्या आहेत त्या कामा करिता त्या विकासकाने सेवा नगर रहिवाशांचा पाणीपुरवठा तोडला आणि तो विना मीटर स्वतःच्या जागेत वळवला आहे. सेवा नगर रहिवाशांचा वहिवाटीचा रस्ता सुद्धा बंद करून टाकला आहे. सेवा नगरला १००० ची लोकवस्ती आहे आणि सर्वांना एकच रस्ता आहे. मुलांना शाळेत जायचं असेल किंवा लोकांना कामावर जायचं असेल किंवा शौचालायला जायला हा एकच रस्ता आहे तो ही विकासकाने बंद केला आहे, त्या विकासकाचे आर्किटेक्ट, एस.आर.ए. चे अधिकारी सर्वांनी विकासकाला नोटीस दिली आहे की तो मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. पण विकासक त्यांची मनमानी करत आहे, असे सेवा नगरच्या रहिवाशांनी पी.एन.आर. न्युजला सांगितले.

या वेळी स्थानिक भूतपूर्व नगरसेवक सुद्धा त्यांची समस्या ऐकायला आले होते आणि त्यांनी लगेल मनपा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून कार्यवाही करायला भाग पडले. विकासकजे पाणी विना मीटर वापरत होता ते बंद केले व सेवा नगर रहिवाशांचा रस्ता तत्काळ मोकळा केला जावा अशी नोटीस सुद्धा दिली गेली. आम्ही सेवा नगरची ही बातमी आमच्या कार्यालयला संपादित करत असतांना पुन्हा सेवा नगर वरून फोन आला की विकासकाची माणसे मनपाने बंद केलेली पाण्याची लाईन अनधिकृतपणे परत जोडत आहेत. तेव्हा एक रहिवासी नसीर हुसेन यांनी त्या अनधिकृत कामाचा व्हिडिओ बनवताना त्यांना विचारले ही लाईन का जोडत आहात, तर त्यांच्यावर विकासकाच्या माणसांनी हल्ला केला आणि प्रचंड मारहाण केली.  नंतर सेवा नगर रहिवाशांनी नसीरला रुग्णालयात दाखल केले व टिळक नगर पोलीस ठाण्यात विकासात व त्यांचा माणसां विरुद्ध तक्रार नोंदवली.


Popular Posts