मुलुंड
पश्चिमेस पाच रास्ता येथील महर्षी अरविंद चौक येथील पंचशील नर्सिंग होम, एम.जी. रोड, बिलेश्वर
महादेव मंदिराच्या
बाजूस असलेल्या टेलिफोन बूथ समोर वर्षानुवर्षे जनसेवार्थ उभा असलेला हा अग्निशमन
फायर हायड्रंट एप्रिल २०१८ रोजी एका अवजड वाहनाच्या धडकेमुळे वाकला होता. आज त्याठिकाणाहून तो गायब झाला आहे. सदर
अग्निशमन फायर हायड्रंट चोरीस गेला कि महानगरपालिकेच्या संबंधीत विभागाने त्यास
काढून घेतले आहे हे जरी स्पष्ट नसले तरी एक मात्र खरे गेले मुलुंड पश्चिम येथील या
चौकस कडी आग लागली तर ती विझवण्यास अग्निशमदलास तत्परतेने सेवार्थ कैक दशके
निस्वार्थपणे उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट शाहिद झाला आहे. टी विभाग कार्यालयाच्या संबंधित विभागाने या
गायब झालेल्या अग्निशमन फायर हायड्रंटची नोंद घेतली असावी हीच अपेक्षा!
Friday, December 28, 2018
Wednesday, December 26, 2018
पिण्याचे पाणी असे वाया जात आहे!
जे.एन. मार्ग आणि झवेर रोड जंक्शन येथील गीता
कलेक्शन दुकानासमोरील रस्त्याच्या खाली असलेली पिण्याच्या पाण्याची मनपा पाईपलाईन
कित्येक दिवस फुटली असून त्यातुन दिवसरात्र पाणी वाहून वाया जात आहे. काँक्रीटच्या
रासत्यमधून पाणी झिरपत असल्यामुळे खाली असलेली पाईपलाईन चांगलीच फुटली असावी कारण
त्यामुळेच हे पाणी काँक्रीट मधून वाट करीत रस्त्यावर वाहत आहे.
सरकार आणि मनपा द्वारे पाण्याच्या अपव्यय
टाळण्याचे वारंवार आवाहन होत असताना मनपा पाणी विभाग आणि अपत्कालीन विभाग याकडे
डोळेझाक करीत आहेत हे नवलच!
Friday, December 14, 2018
सदर पदपथावर चालणे हानिकारक !!
मुलुंड पश्चिम येथील साईधाम परिसर असून येथील पी.के. मार्ग लागत असलेल्या पदपथावरील
नाल्याचे ढाकणे तुटलेले आहे. सदर परिसरात तीन
शाळा आहेत व त्यांची भरण्याची व सुटण्याची वेळ देखील जवळपास सारखीच आहे. शाळेत जाणारी मुलं किंवा त्यांचे पालक अथवा पादचारी यांपैकी कोणीतरी ह्या
ठिकाणी पडून अपघात झाल्यावरच मनपा टी विभाग
कार्यालय जागृत होऊन येथे ढाकणे बसवलं असे वाटते. तो पर्यंत वाट
पाहण्यापेक्षा इतर पर्याय नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वीणा नगर पुलावर टेम्पो चालकांची वारंवार घुसखोरी.
मुलुंड
पश्चिम येथे मनपा पाईप्लाईन वरून वीणा नगर व स्वप्ननगरी या विभागांना जोडणाऱ्या पुलावर नेहमीच अशी
जबरदस्तीची घुसखोरी होत असते व त्यामुळे येथे
वाहतुकीची समस्या निर्माण होते.
सदर
पूल केवळ हलक्या वाहनांसाठी निर्मित करण्यात आला असताना देखील अनाधिकृपणे उंची
वाढवलेले छोटे टेम्पो एक किलोमीटचे अंतर टाळण्यासाठी या पुलाचा वापर करतात. सदर
समस्येवर मात करण्यासाठी मनपा द्वारा एक आठ फुटाचे बॅरीकेड स्वरूपी कमान उभारण्यात
आली मात्र तरी देखील व्यावसायिक व अवजड वाहतूक करणारे टेम्पो या मार्गाने जबरदस्ती
घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीने अडकतात. असे करणाऱ्या वाहनांसाठी मनपा
व वाहतूक पोलिसांनी मिळून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे असे
स्थानिकांची मागणी आहे.
Tuesday, December 11, 2018
टी विभागाचा अजब गजब कारभार !
मुलुंड
पश्चिम येथील मनपा टी विभाग
कार्यालयापासून जेमतेम शंभर मीटरच्या अंतरावर 100 असलेल्या बिलेश्वर महादेव मंदिरासमोरील
पदपथाखाली असलेल्या गटाराचे ढाकण कित्येक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुटलेल्या ढाकणाबाबत मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता
तातडीचा उपाय म्हणून त्याच तुटलेल्या ढाकणावर अजून एक तूटलेल्या ढाकण टाकण्यात आले
आहे.
एखादी
घटना घडल्यानंतरच टी विभाग मनपा प्रशासनास जाग येणार आहे असे वाटतंय!
काय
म्हणावे मनपाच्या या गंभीर थुकपट्टी कामाला..?
Saturday, December 1, 2018
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...