Friday, December 28, 2018

अग्निशमन फायर हायड्रंट गायब !



मुलुंड पश्चिमेस पाच रास्ता येथील महर्षी अरविंद चौक येथील पंचशील नर्सिंग होम, एम.जी. रोड, बिलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूस असलेल्या टेलिफोन बूथ समोर वर्षानुवर्षे जनसेवार्थ उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट एप्रिल २०१८ रोजी एका अवजड वाहनाच्या धडकेमुळे वाकला होता.  आज त्याठिकाणाहून तो गायब झाला आहे. सदर अग्निशमन फायर हायड्रंट चोरीस गेला कि महानगरपालिकेच्या संबंधीत विभागाने त्यास काढून घेतले आहे हे जरी स्पष्ट नसले तरी एक मात्र खरे गेले मुलुंड पश्चिम येथील या चौकस कडी आग लागली तर ती विझवण्यास अग्निशमदलास तत्परतेने सेवार्थ कैक दशके निस्वार्थपणे उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट शाहिद झाला आहे.  टी विभाग कार्यालयाच्या संबंधित विभागाने या गायब झालेल्या अग्निशमन फायर हायड्रंटची नोंद घेतली असावी हीच अपेक्षा!

No comments:

Popular Posts

Shop for Rent – Mulund West (Prime Location)

Location Highlights: Road-facing shop in a newly constructed building In a famous society, right next to Apna Bazar & Maharashtra Se...