Monday, June 7, 2021

लोकसहभागातून म्हाडा कॉलनीत CCTV संच तर म्हाडातर्फे मैदानात LED विजेच्या ...


लोकसहभागातून म्हाडा कॉलनीत 9 CCTV संच तर म्हाडातर्फे मैदानात LED विजेच्या 12 खांबासह दिव्यांची सोय

मुलुंड पूर्व म्हाडा कॉलनी येथे हिंदुस्तान बँकेजवळ मैदान असून या मैदानात लाईट नसल्याने हे मैदान तळीराम व गर्दुल्यांचा अड्डा झाला होता .या मैदानाची मालकी म्हाडाकडे असल्याने तेथे पालिकेकडून लाईट लावणे शक्य नव्हते .आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त होते. गेली दोन  वर्षे सातत्याने म्हाडा असोसिएशनच अध्यक्ष रवी नाईक व सचिव पुष्कराज माळकर यांनी पाठपुरावा केला  आणि अखेर ह्या मैदानात १२५ वॅटच्या १२ पोल १५ एल ईडी लाईट म्हाडा उपाध्यक्षांकडून मंजूर करून लावण्यात  आले आहेत. ह्या म्हाडा परिसरात व मैदानात वॉच रहावा म्हणून म्हाडातील नवरात्र मंडळ व रहिवाश्यांच्या मदतीने हाय रेंज नाईट व्हिजन लेटेस्ट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अजून तीन कॅमेरे या आठवड्यात लागतील. या लाईट व सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन मा.श्री सुनील कांबळे साहेब (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) यांच्या शुभहस्ते झाले. ह्या प्रसंगी निवृत्त म्हाडाचे डेप्युटी इंजिनियर श्री विलास पाटील, नवरात्र मंडळाचे पदाधिकारी, सल्लागार विनायक सुतार, असो. सल्लागार दिवाकर कोयांदे उपस्थित होते, महावितरण, पालिका, नवघर पोलिस स्टेशन, व प्रायोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Popular Posts

Shop for Rent – Mulund West (Prime Location)

Location Highlights: Road-facing shop in a newly constructed building In a famous society, right next to Apna Bazar & Maharashtra Se...