Monday, February 11, 2019

मुलुंड पूर्व झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट


मुलुंड पूर्व नवघर १ल्या गल्लीत झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात ७ झोपड्या  जळून खाक झाल्या. सुदैवाने या स्फोट आणि आगीत जीवितहानी झाली नाही.
सात फायर इंजिन ३ पाण्याचे टॅंकर यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीमुळे येथील परिसरात घबराट उडाली.  घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सुर्यवंशी आणि  त्यांचे कर्मचारी जातीने हजर होते.


Sunday, February 10, 2019

साध्या फोनवरूनही पैसे पाठविणे आता अधिक सोपे आणि अधिक सुरक्षित!


कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मितेश ठक्कर
कल्पकता, संघटनकौशल्य आणि समाजोपयोगिता या निकषांवर महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2019 मध्ये एकूण 1600 स्पर्धकांमधून 24 कंपन्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. त्यात मिंकव्हिल या कंपनीच्यामिसकॉलपे’ (MissCallPay) या अभिनव प्रकल्पाला पुरस्काराबरोबरच तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाची पंधरा लाख रुपयांची ऑर्डरही मिळाली. या गावंमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला जाईल. त्याबरोबरच त्याला एनपीसीआय आणि बँकांशी जोडण्यासाठीही शासनानं अनुकूलता दर्शवली आहे.
मुंबईतल्या मितेश ठक्कर यांनी विकसित केलेल्यामिसकॉलपेया तंत्रज्ञानामुळे देशभरात पेमेंट किवा पैसे देण्याची क्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. एवढंच नाही, तर त्यामुळे व्यापाऱ्यांचापॉईंट ऑफ सेलकिंवा विक्री केंद्राच्या यंत्रणेवरचा खर्च केवळ शंभर रुपयांपर्यंत खाली येणार आहे.
मिसकॉल पे नेमकं आहे तरी काय? एक काळ असा होता की आर्थिक व्यवहार रोकड वापरुनच केले जायचे. गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारानं भारतात डिजिटल अर्थव्यवहाराचं प्रमाण वाढलं. त्यामुळे रोकड वापरुन केलेल्या व्यवहारातली जोखीम कमी झाली. अर्थव्यवहारात सुलभता आली. मात्र त्यातहीपीओएसयंत्रांची किंमत जास्त असल्यामुळे कार्ड स्वाईप करण्याची सोय अद्याप सर्वत्र म्हणावी तशी उपलब्ध झालेली नाही. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियो कंपनीनं 3000 रुपयांना पीओएस यंत्र उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. मात्र, मितेश ठक्कर यांच्या मिसकॉलपे यंत्रणेमुळे बँकांच्या सहकार्यानं इंटरनेटवर पीएसओची निर्मिती होणार आहे. त्याचा दरमहा खर्च असेल, केवळ शंभर रुपये! मिसकॉल पेच्या स्वनिर्मित तंत्रज्ञानामुळे रोकड हा अर्थव्यवहाराचा प्रमुख मार्ग राहता वापरकर्त्यांना सुलभ डिजिटल पर्याय उपलब्ध होईल. एवढंच नाही, तर वापरकर्त्याला बँकेची कामं किंवा इतर अर्थव्यवहार सहज आणि सुरक्षितपणे आपले कुटुंबीय किंवा मित्र यांच्या मदतीनं करणं सहज शक्य होईल. स्मार्टफोनच्या दिवसागणिक वाढणाऱ्या वापरामुळे डिजिटल पेमेंटच्या पर्यायांमध्येही वेगानं वाढ होतेय. पे टीएम, गूगल पे, फोन पे, अमेझॉन पे असे अनेक पर्याय उपलब्ध होतायत. आता व्हॉटस अॅप पेसुद्धा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. पण या सगळ्या सुविधा आणि मिसकॉल पे यांच्यात एक महत्वाचा फरक आहे. मिसकॉल पे साठी तुम्हाला कोणतंही अॅप वापरण्याची गरज नाही. एवढंच नाही, तर इंटरनेटचीही गरज नाही. यात तुम्हाला फक्त मिसकॉल पे च्या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे. तुम्ही आवश्यक ते तपशील दिल्यानंतर तुमचं बँक खातं मिसकॉल पे शी जोडलं जाईल. त्यानंतर केव्हाही कुणालाही पैसै द्यायचे असतील, तर तुम्ही फक्त एका नंबरवर मिसकॉल द्यायचा. मिसकॉल दिल्यावर तुम्हाला तुमच्या बँकेतून फोन येईल आणि तुम्हाला करायच्या असेलेल्या पेमेंटविषयी तपशीलांची खातरजमा करुन घेतली जाईल. बस्स. आता तुम्ही निश्चिंत रहायचं, तुमची बँक पैसे हव्या त्या खात्यात जमा करेल. सध्या याच्या प्रात्यक्षिकासाठी 08066740740 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे. मिसकॉल दिल्या नंतर त्याच नंबर वरून तुम्हाला कॉल येईल विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्याची खात्री करून घेतली जाईल. जर पैसे वळते करावयाचे असतील तर अंकी upi दाबा किंवा कॉल कट करा. ह्या डेमो नंबर करिता upi पिन आहे 1111.
ऑनलाईन पैसे ट्रानस्फर करताना चुकीचा खाते क्रमांक टाईप होणं किंवा चुकीचा मोबाईल क्रमांक टाईप झाल्यामुळे पैसे दुसऱ्यालाच मिळणं अश्या मानवी त्रुटींना यात जागाच नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अनियमित वीजपुरवठ्यामुळे इंटनरनेटच्या वापरावर मर्यादा आहेत. शिवाय, अनेक ज्येष्ठ नागरिकांना इंटरनेट वापरणं त्रासदायक वाटतं ही वस्तुस्थिती आहे. मिसकॉल पे वापरण्यासाठी इंटरनेटची गरज नसल्यामुळे ही समस्या सुटायला मदत होणार आहे.
या प्रक्रियेत एमडीआर (व्यापारी सवलत दर) म्हणजेच ग्राहकाच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाचा वापर करण्याचा मोबदला म्हणून बँक व्यापाऱ्यांना आकारत असलेलं शुल्क, अगदी अत्यल्प असेल. शिवाय कंपनीनं व्यापाऱ्यांच्या विक्री आणि विपणनाला चालना देण्यासाठी काही अॅप्लिकेशन्सही विकसित केलेली आहेत. या अॅप्लिकेशन्समुळे मोठ्या व्यापाऱ्यांसाठी ग्राहकांनी व्यापाऱ्यांच्या वेबसाईटला दिलेली भेट आणि प्रत्यक्ष विक्री यांचा दर तब्बल 600 टक्क्यांनी वाढला तसंच व्यापाऱ्यांचा कॉल सेंटरवरचा खर्च ऐंशी टक्क्यांनी कमी झाला, असं कंपनीचं म्हणणं आहे.
अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीच्या अॅप्लिकेशन्सना गोदरेज सिक्युरेटीज, आयसीआयसीआय होम फायनान्स आणि युरेका फोर्ब्स सारखे प्रतिष्ठित ग्राहक मिळाले आहेत.
मिसकॉल पे ला केंद्र सरकारच्या डिजी धन अभियानाच्या प्रमुखांकडून तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाक़डून पाठिंबा दर्शवणारी पत्रं मिळाली आहेत. मिसकॉल पे नं सोलापूर जनता सहकारी बँकेसह या प्रकल्पाला प्रायोगिक तत्वावर सुरुवातही केली आहे.
आयआयएम अहमदाबाद आणि आयआयटी मुंबईची मान्यता प्राप्त केलेल्या मिसकॉल पे ला अमेरिकन एमआयटीची मान्यतीही मिळालेली आहे. तसंच मिसकॉल पे नं फिन्टिग्रेट झोन 2019 या मेळाव्यात पहिल्या पन्नास स्टार्टअप्समध्ये स्थान पटकावलंय.
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2019 महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेतर्फे (MsInS) आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2019 चा उद्देश राज्यातल्या उद्योजकांना प्रोत्साहन देणं, एकत्र आणणं आणि सक्षम बनवणं हा आहे. या उपक्रमामुळे राज्यभरातल्या विविध उद्योजकांना त्यांच्या नवनवीन उद्यम-कल्पना शासनासमोर आणण्याची संधी मिळते. शासनाला यातले काही उद्योग राबवण्याच्या शक्यतांची चाचपणी करता येते, त्याच्या व्यवसायाच्या विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतात, तसंच महाराष्ट्राला स्टार्टअपसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्यात या उद्योजकांचा हातभार लागतो.
या सप्ताहात सहभागी झालेल्या 1600 स्टार्टअप उद्योगांमधून निवडलेल्या 24 उद्योगांना शासनाकडून प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचे कार्यादेश मिळणार आहेत. त्यातून त्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेसाठी सातत्यपूर्ण विकास उद्दिष्टं साध्य करण्यात शासनासह काम करणं शक्य होईल.

   
Popular Posts