मुलुंड येथे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने 14 एप्रिल 2023 रोजी बाबासाहेबांना सामुहिक वंदन करण्यात आले.
मुलुंड पशचिमेला एस.वि.पी रोड मुलुंड स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री कांतीलाल दादाराम कोथिंबीरे साहेब तसेच पोलीस सब इन्स्पेक्टर मा. श्री मुकेश घोलप साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होतो व व.पो.नी. कोथिंबीरे साहेबांच्या हस्ते अल्पोपाहार वाटप करण्यात आला. आयोजक म्हणून आनंद साबळे प्रदेश सरचिटणीस (भाजप अ.जा.मोर्चा ), नितीन आहेर, अनिल भाई, हरिवंशराय मौर्य, संजय दुबे, अविनाश साबळे, ओसामा अन्सारी, प्रकाश जाधव, जगन्नाथ लोखंडे , ईत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते.