Friday, December 14, 2018

वीणा नगर पुलावर टेम्पो चालकांची वारंवार घुसखोरी.

मुलुंड पश्चिम येथे मनपा पाईप्लाईन वरून वीणा नगर व स्वप्नगरी या विभागांना जोडणाऱ्या पुलावर नेहमीच अशी जबरदस्तीची घुसखोरी होत असते व त्यामुळे येथे  वाहतुकीची समस्या निर्माण होते. 

सदर पूल केवळ हलक्या वाहनांसाठी निर्मित करण्यात आला असताना देखील अनाधिकृपणे उंची वाढवलेले छोटे टेम्पो एक किलोमीटचे अंतर टाळण्यासाठी या पुलाचा वापर करतात. सदर समस्येवर मात करण्यासाठी मनपा द्वारा एक आठ फुटाचे बॅरीकेड स्वरूपी कमान उभारण्यात आली मात्र तरी देखील व्यावसायिक व अवजड वाहतूक करणारे टेम्पो या मार्गाने जबरदस्ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीने अडकतात. असे करणाऱ्या वाहनांसाठी मनपा व वाहतूक पोलिसांनी मिळून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे असे स्थानिकांची मागणी आहे.No comments:

Popular Posts