Friday, May 10, 2024

As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.

 As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.


मिहिर कोटेचा आता ‘खोटे’चा ठरल्याने किरीट सोमय्यांना पुढे आणावे लागले मात्र तेही फेकय्या असल्याचे मुलुंडकरांचे मत

 

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड मध्ये धारावीकरांचे पुर्नवसन करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी एकही भाजप नेत्याने या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. किरीट सोमय्या या विषयावर बोलायला तयार नव्हते. आता अचानक त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आपली बाजु मांडली. केवळ मराठी मतांसाठी किरीट सोमय्या यांनी या प्रकल्पाला विऱोध केला असल्याचे मुलुंडकरांचे म्हणणे आहे.

 

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर मुलुंड मध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. साखळी आंदोलन, साखळी उपोषण करुन मुलुंडकरांनी धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध केला होता. मात्र या दरम्यान एकही भाजप नेत्याने या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे सांगितले नव्हते. आता मात्र निवडणुक लागल्यानंतर आचारसंहिता चालू असताना केवळ दिखावा म्हणुन आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धारावी प्रकल्पाला विरोध केला. हि बाब लोक्याच्या लक्षात आल्यावर लोकांनी कोटेचा यांच्यावर विश्वास ठेवायचे सोडून दिले. कोटेचा कार्ड चालत नाही म्हणुन त्यांनी किरीट सोमय्यांना पुढे आणले. कारण गेले वर्षभर सोमय्या यांनी इतरांना जेल मध्ये टाकण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या. त्यावेळी त्यांनी एकदाही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला आपला विरोध असल्याचा उल्लेख केला नाही. आता मात्र त्यांना अचानक मुलुंडकरांची आठवण झाली. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विरोध असल्याचे जाहिर केले. मुळात भाजप मध्ये किरीट सोमय्या यांचे काहीच वजन राहिले नसून आता त्यांना कोणीच विचारत नाही. किमान राज्यसभा मिळेल अशी अपेक्षा सोमय्या होती. मात्र त्यांना तेही देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी बराच प्रयत्न केला. पण एका खाजगी वाहिणीने त्यांचे व्हिडीओ दाखवुन सोमय्या यांची बदनामी केली. त्यामुळे सोमय्या यांना लोकसभेचे तिकीट ही देण्यात आले नाही. आता चर्चेत राहायचे म्हणुन त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन धारावी प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. अशी माहिती अँड. सागर देवरे यांनी पत्रकारांना दिली. किरोट सोमय्या हे कोटेच्या सारखेच फेकय्या असल्याचे मुलुंडकरांनी सांगितले. आता यांनी काहीही केले तरी यांना मतदान करणार नसल्याचे मुलुंडकरांनी पत्रकारांना सांगितले.



No comments:

Popular Posts