Friday, May 10, 2024

Kotecha again proved to be a 'lie', Mulundkar's decision not to vote for Kotecha

 कोटेचा पुन्हा ‘खोटे’चा ठरले, कोटेच्यांना मत देणार नसल्याचा मुलुंडकरांचा निर्णय
 

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड परिसरात टर्मिनस व क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन देणारे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी पुन्हा एकदा मुलुंडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहे. गेल्या पाच वर्षात आश्वासना शिवाय काहीच काम न करणा-या कोटेचा यांनी एकाच ठिकाणी दोन वेळा भुमीपुजन करुनही पाच वर्षात क्रीडा संकुल बांधले नाही. कोटेचा हे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देण्याच काम करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

दिवंगत आमदार सरदार तारासिंग यांनी मुलुंड मध्ये क्रीडा संकुल व्हावे म्हणुन पाच वर्षापुर्वी भुमिपुजन केले होते. त्यानंतर आमदार मिहिर कोटेचा यांनी त्याच जागेवर दुस-यांदा भुमिपुजन केले. मात्र पाच वर्षात त्यांनी काहीच काम केले नाही. गेल्या पाच वर्षांत कोटेचा यांनी विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासन देण्याचे काम केले. मुलुंड मध्ये वाहतुकीची मोठी समस्या असून त्यावर कोटेचा यांनी काहीच उपाययोजना केली नाही. हरिओमनगर मधील रहिवाश्यांना आजही टोल भरावा लागतो. त्याबाबत अनेकदा आंदोलन करुनही कोटेचा यांनी दुर्लक्ष केले. हरिओम नगर मधील रहिवाश्यांनी कोटेचा यांच्याशी अनेकदा पत्रव्यावहारही केला. मात्र कोटेचा यांनी आश्वासना शिवाय काहीच केले नाही. निवडणुका जवळ आल्यावर कोटेचा यांनी टोलचा प्रश्न लवकरच निकाली काढू येत्या पाच वर्षात क्रीडा संकुल व टर्मिनसचे काम सुरु करु असे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर मुलुंडकरांना दिले. मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने काहीच काम केले नाही ते आता काय करतील असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

No comments:

Popular Posts