Friday, May 10, 2024

तरुण मतदारांची भाजपकडे पाठ, मराठी गुजराती वाद निर्माण करणा-यांना मतदान नाही

Young voters turn their backs on BJP, Marathi Gujaratis don't vote for controversies


मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मराठी गुजराती असा वाद निर्माण करणा-या मिहिर कोटेचांना मतदान करणार नसल्याचा निर्णय ईशान्य मुंबईतील मराठी तरुणांनी घेतला आहे. केवळ मतांसाठी लोकांकडे जाणा-या कोटेचांना आता मतदारांनीच पाठ फिरवायला सुरवात केली आहे.


राज्यातील अनेक उद्योग गुजरात मध्ये नेणा-या भाजप सरकारने बेरोजगार मराठी तरुणांचा साधा विचारही केला नाही. महागाई
, बेरोजगारी वाढविण्याशिवाय भाजपने गेल्या दहा वर्षात काहीच काम केले नाही. आता निवडणुक आल्यावर भाजपला मराठी मतदारांची आठवण झाली. याच मराठी लोकांना गुजराती वस्ती असलेल्या ठिकाणी घर, दुकान नाकारण्यात आले. मुंबई सारख्या ठिकाणी शिवसैनिकांना इमारती मध्ये प्रवेश दिला नाही. अशा वेळी मतदान मागायला येणा-या मिहिर कोटेचा यांनी गेल्या पाच वर्षात काय केले असा प्रश्न विचारल्यावर कोटेचा संताप व्यक्त करतात. हा अनुभव अनेक तरुण मतदारांनी सांगितला. मराठी माणसांचा व्देष करणा-या भाजपला मतदान करणार नसल्याचा निर्णय ईशान्य मुंबईतील तरुण मतदारांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

No comments:

Popular Posts