Sunday, August 15, 2021

श्री विनोद रमेश पाटील, यांच्या मुलुंड(पश्चिम) जनसंपर्क कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला


आज सकाळी ८.४५ वाजता श्री विनोद रमेश पाटील, उपाध्यक्ष- भाजप, ईशान्य मुंबई यांच्या मुलुंड(पश्चिम) जनसंपर्क कार्यालय येथे भाजपा पक्षाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील भाजप खासदारांचे प्रतोद तथा खासदार मनोज किशोर कोटक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका रजनी केणी व अन्य पदाधिकारी यांच्यासह जनसमुदाय उपस्थित होता. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे राष्ट्रगीत गाताना सर्वांचाच ऊर देशभक्तीने भरुन आला होता. यावेळी खासदार मनोज कोटक यांच्यासह विनोद रमेश पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Popular Posts