Thursday, January 3, 2019

बाथरूम मध्ये गुदमरून मृत्यू



नव वर्षाचे स्वागत लोणावळा येथे करून १ जानेवारी २०१९ रोजी मुलुंड येथील राहत्या घरी परतलेली २१ वर्षीय ईशानी नितीन गाला थकली होती आणि आंघोळ करून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली. मात्र व्हेंटिलेशन, खिडकी बंद असल्यामुळे व त्यात भर म्हणजे गिझर मधून गरम पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेली उष्णता आणि बाष्प निर्मितीमुळे ईशानीचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेबाबत प्राथमिक चौकशी मधये काहीही संशयास्पद न आढळल्याचे पोलीस चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Friday, December 28, 2018

अग्निशमन फायर हायड्रंट गायब !



मुलुंड पश्चिमेस पाच रास्ता येथील महर्षी अरविंद चौक येथील पंचशील नर्सिंग होम, एम.जी. रोड, बिलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूस असलेल्या टेलिफोन बूथ समोर वर्षानुवर्षे जनसेवार्थ उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट एप्रिल २०१८ रोजी एका अवजड वाहनाच्या धडकेमुळे वाकला होता.  आज त्याठिकाणाहून तो गायब झाला आहे. सदर अग्निशमन फायर हायड्रंट चोरीस गेला कि महानगरपालिकेच्या संबंधीत विभागाने त्यास काढून घेतले आहे हे जरी स्पष्ट नसले तरी एक मात्र खरे गेले मुलुंड पश्चिम येथील या चौकस कडी आग लागली तर ती विझवण्यास अग्निशमदलास तत्परतेने सेवार्थ कैक दशके निस्वार्थपणे उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट शाहिद झाला आहे.  टी विभाग कार्यालयाच्या संबंधित विभागाने या गायब झालेल्या अग्निशमन फायर हायड्रंटची नोंद घेतली असावी हीच अपेक्षा!

Popular Posts

Nitin Maniar News Impact: Massive Revelation by MSEDCL; 'Negligence is by BMC, Not Us! Over ₹82 Lakhs Paid for Road Restoration'

Sensation After Journalist Nitin Maniar’s Report: Sub-Engineer Deepak Jadhav Exposes Official Documents; Mulund T-Ward Under Scrutiny for Sl...