Wednesday, December 26, 2018

पिण्याचे पाणी असे वाया जात आहे!


जे.एन. मार्ग आणि झवेर रोड जंक्शन येथील गीता कलेक्शन दुकानासमोरील रस्त्याच्या खाली असलेली पिण्याच्या पाण्याची मनपा पाईपलाईन कित्येक दिवस फुटली असून त्यातुन दिवसरात्र पाणी वाहून वाया जात आहे. काँक्रीटच्या रासत्यमधून पाणी झिरपत असल्यामुळे खाली असलेली पाईपलाईन चांगलीच फुटली असावी कारण त्यामुळेच हे पाणी काँक्रीट मधून वाट करीत रस्त्यावर वाहत आहे.

सरकार आणि मनपा द्वारे पाण्याच्या अपव्यय टाळण्याचे वारंवार आवाहन होत असताना मनपा पाणी विभाग आणि अपत्कालीन विभाग याकडे डोळेझाक करीत आहेत हे नवलच!


Friday, December 14, 2018

सदर पदपथावर चालणे हानिकारक !!


मुलुंड पश्चिम येथील साईधाम परिसर असून  येथील पी.के. मार्ग लागत असलेल्या पदपथावरील नाल्याचे ढाकणे तुटलेले आहे. सर परिसरात तीन शाळा आहेत व त्यांची भरण्याची व सुटण्याची वेळ देखील जवळपास सारखीच आहे. शाळेत जाणारी मुलं किंवा त्यांचे पालक अथवा पादचारी यांपैकी कोणीतरी ह्या ठिकाणी पडून अपघात झाल्यावरच मनपा टी विभाग  कार्यालय जागृत होऊन येथे ढाकणे बसवलं असे वाटते. तो पर्यंत वाट पाहण्यापेक्षा इतर पर्याय नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Popular Posts

Nitin Maniar News Impact: Massive Revelation by MSEDCL; 'Negligence is by BMC, Not Us! Over ₹82 Lakhs Paid for Road Restoration'

Sensation After Journalist Nitin Maniar’s Report: Sub-Engineer Deepak Jadhav Exposes Official Documents; Mulund T-Ward Under Scrutiny for Sl...