Friday, May 17, 2024

मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो

मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो
रेल्वे, मेट्रो सेवा बंद केल्याने मुंबईकरांनी वाहिल्या लाखोल्या
कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे व मेट्रो सेवा बंद
प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक मधून चालत घर गाठले







मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – घाटकोपर येथे मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या रोड शो मुळे मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. याबाबतची कोणतीही पुर्व सुचना प्रवाशांना न दिल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी दिसून येत होती. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान मोदींना मुंबईकरांनी लाखोल्या वाहिल्या.

लोकसभेच्या मुंबईतील सहाही जागांवर संक्रांत आली असून भाजपच्या उमेदवारांनी नाराज असलेल्या मुंबईकरांची मतं मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदींनाच रस्त्यावर आणले. घाटकोपर मध्ये त्यांचा रोड शो करण्यासाठी पोलिसांनी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन इतरत्र वळविले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. त्यातच कोणतीही पुर्व सुचना न देता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेट्रो व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे कामावरुन घरी जाणा-या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. लाखो प्रवाशी दोन तासांहुनही अधिक काळ रेल्वे स्थानकावर अडकुन पडले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घामाघुम झालेल्या मुंबईकरांनी भाजपच्या नावाने लाखोल्या वाहण्यास सुरवात केली. लहान मुले, गरोदर महिला, आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मोदींच्या रोड शोने प्रचंड मनस्थाप सहन करावा लागला. नाईलाजाने प्रवाशांना रेल्वे ट्रक मधून चालत आपल्या नियोजित स्थळी जावे लागत होते. रेल्वे विभागाकडून रेल्वे सेवा बंद करण्याच्या सुचनाही प्रवाशांना दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे नेमके काय झाले याबाबत मुंबईकर प्रवाशी संभ्रमात पडले होते. तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागण्यासाठी रोड शो करणा-या भाजपच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय संतप्त प्रवाशांनी घेतला. त्याबाबत अनेक प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान मोदींनी मुंबईत रोड शो केल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल अशी सर्वाची अपेक्षा होती. मात्र परिस्थिती उलटी झाली. भाजपला मिळणारे मतं ही आता कमी होणार असून त्यांच्या मुंबईतील सर्व जागा अडचणीत आल्या असल्याचे जाणकारांचे मत आहे. तर दुसरीकडे घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढत असताना मोदींनी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशीही केली नाही. किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेटण्याची तसदीही घेतली नाही. केवळ मतांसाठी मुंबईत आलेल्या मोदींना या रोड शोचा काहीच फायदा होणार नसल्याचे लोकांनी सांगितले.




No comments:

Popular Posts

“70 वर्षीय लीलाबाई पिपरिया के साथ अपने ही बेटों ने की धोखाधड़ी – एक माँ ...

“70 वर्षीय लीलाबाई पिपरिया के साथ अपने ही बेटों ने की धोखाधड़ी – एक माँ की न्याय के लिए गुहार ! ” मुंबई , 24 अक्टूबर 20...