Friday, May 17, 2024

संजय भाऊंना मिळणार राजा ढाले व आठवले गटाची मतं

 



मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – स्वर्गिय राजा ढाले प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा अँड. गाथा ढाले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अनिल ओव्हाळ यांनी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

 गाथा ढाले आणि अनिल ओव्हाळ यांनी भाडुंप येथे संजय दिना पाटील  यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहिर केला. यावेळी संजय दिना पाटील यांची कन्या राजोल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. स्वर्गिय राजा ढाले यांना मानणारा एक मोठा वर्ग घाटकोपर, चेंबुर, गोवंडी, विक्रोळी, भांडुप व मुलुंड भागात आहे. दरम्यान राजा ढाले यांनी रामदास आठवले यांना घडविले आहे. त्यामुळे आठवले गट हा राजा ढाले प्रतिष्ठानशी विविध कार्याच्या माध्यमातून कायम जोडला गेला आहे. मुंबई मराठी माणसांची राहिली पाहिजे आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना पाठिंबा देत आहोत असे गाथा ढाले यांनी सांगितले.

 भाजपच्या गुजरात धार्जिण्या राजकारणामुळे मराठी माणुस मुंबईच्या बाहेर फेकला जात आहे. मराठी माणसांची कामे ईशान्य मुंबईत गेल्या दहा वर्षात झालेली नाही. याअगोदर भाजपच्या दोन्हीही गुजराती खासदारांनी मराठी माणसांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मराठी माणुस भाजपच्या गुजराती धार्जिण्या राजकारणामुळे अस्वस्थ आहे. त्यात ईशान्य मुंबईतील मागासवर्गीय वस्त्यांकडे भाजपच्या गुजराती खासदारांनी नेहमीच पाठ फिरवली. त्यांनी कोणतीही विकासाची कामे मागासवर्गीय भागात केलेली नाही. यामुळे मागासवर्गीय भागात भाजपच्या उमेदवाराविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. असा आरोप गाथा ढाले आणि अनिल ओव्हाळ यांनी यावेळी केला.


No comments:

Popular Posts