Thursday, May 16, 2024

भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणायचे आहे – आदित्य ठाकरे

 भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणायचे आहे – आदित्य ठाकरे
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा जीआर रद्द करणार – आदित्य ठाकरे
चार जुनला इंडिया आघाडीचे सरकार येणार – आदित्य ठाकरे





मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – राज्यात भाजपचे सरकार असताना मोदीं कधी फारसे महाराष्ट्रात आले नाही. राज्यात रोजगार मिळावा म्हणुन काहीच प्रयत्न केले नाही. उलट राज्यातील उद्योगधंदे गुजरात मध्ये नेऊन महाराष्ट्रातील जनतेवर अन्यायच केला. राज्यातील स्थिती काळजी करण्यासारखी असून राज्यात अत्याचाराच्या घटना वाढत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने हे कुठेतरी थांबले पाहिजे त्यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना भरघोष मतांनी निवडून दिल्लीला पाठवायचे आहे. असे उद्गार शिवसेनेचे आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. मुलुंड येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र तसेच मुंबईतील जनतेला आता भाजपचे सरकार नको आहे. ह्र्दयात राम आणि हाताला काम ही आपली हिंदुत्वाची व्याख्या आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेवर भीक मागण्याची वेळ या सरकारने आणली आहे. धारावीकरांच्या पुनर्वसनावर आदित्य ठाकरे म्हणाले आपले सरकार आल्यावर हा जीआर आम्ही रद्द करु आणि धारावीकरांना त्याच ठिकाणी घरे देऊ. भाजपचे उमेदवार मिहिर खोटेचा यांनी स्ट्रीट फर्निचर  घोटाळ्या प्रकरणी विधानसभेत खोटे बोलले. धारावी प्रकरणात लोकांची ते दिशाभुल करीत आहेत. त्यामुळे भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणण्यासाठी संजय दिना पाटील यांना भरघोष मतांनी विजयी करुन दिल्लीला पाठवायचे आहे. जेणेकरुन मशालीचा आवाज दिल्लीला पोहचेल. चार जुनला इंडिया आघाडीचे सरकार येणार म्हणजे येणारच असा माझा ठाम विश्वास असल्याचे ही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सध्या आपल्या देशाची काळजी वाटावी अशी परिस्थिती असून अत्याचाराच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. महाराष्ट्रात स्वतःचे सरकार असतानाही मोदी कधी फारसे महाराष्ट्रात आले नाहीत. आता एका पाठोपाठ एक अशा अनेक सभा ते घेत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी 'मशाल' या चिन्हासमोरील बटण दाबून संजय दिना पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन गटनेते विधिमंडळ कांग्रेस, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली सोडून मुंबईतील गल्लीत यावे लागले. याचे कारण मागील १० वर्षात भाजपचे खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहे‌त. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी उद्याची 'मशाल' आजच पेटवणे गरजेचे आहे. त्यासाठीच येथील जनतेने संजय दिना पाटील यांना विजयी करून दिल्लीला पाठवण्यचा निर्धार केल्याचे मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सांगितले.



No comments:

Popular Posts

🔥 Special Offers for Advertisers

  🌟 Honoured to Attend | Times Impact Business Seminar 🌟 Had the privilege of attending the Times Impact Business Seminar on Saturday, 2...