Tuesday, March 18, 2025

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १०४, एम.जी.रोड, मुलुंड पश्चिम तर्फे शिवजयंतीची भव्य मिरवणूक


मुलुंड पश्चिम : (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. 104 तर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीही परंपरेनुसार या मिरवणुकीचे आयोजन शाखा क्र. १०४, एम.जी.रोड, मुलुंड पश्चिम श्री राजेश हरीश साळी शाखाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

 






ही भव्य मिरवणूक रविवार, दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता एम.जी. रोड, मुलुंड पश्चिम येथून आयोजित करण्यात आली होती. मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय रामदास जोशी ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिरवणुकी ची सूरुवात केली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाथेचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, दांड पट्टा, लेझीम पथकांच्या सहभागासह, उत्साही शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रमुख मान्यवर: श्री. लिलाधरजी डाके (शिवसेना नेते), श्री. संजयजी राऊत (खासदार - नेते), श्री. दत्ता दळवी (उपनेते - मा. महापौर), श्री. संजय पाटील (खासदार), श्री. रमेश कोरगांवकर (मा. आमदार, विभाग प्रमुख), सौ. राजराजेश्वरी रेडकर (महिला विभाग संघटीका), कु. राजोल संजय पाटील (युवा सेना कार्यकारिणी सदस्य), सौ. नंदिनी सावंत (महिला विभाग प्रमुख), सिताराम खांडेकर (उपविभाग प्रमुख), श्रीमती. हेमलता सुकाळे (उपविभाग संघटीका), सौ. पुष्पा अनपट (महिला विभाग संघटीका), श्री. चंद्रकांत घडशी (समन्वयक), श्री. अमित चव्हाण (युवा सेना विधानसभा अध्यक्ष), सौ. शिला सोनावणे (महिला विभाग कार्यालयप्रमुख), सौ. योगिता रांजोळी (महिला शाखा संघटीका), श्रीमती. गीता साळवी (महिला निरीक्षक), सौ. रंजना काळे (महिला निरीक्षक), श्री. संजय सावंत (कार्यालय प्रमुख)

 

शिवजयंतीच्या या सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यासाठी शाखाप्रमुख श्री राजेश हरीश साळी व त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली होती. तरी सर्व शिवभक्त व नागरिकांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवली.


Popular Posts

• "Turn Your Passion Into Action — Join Our Team!"

  • "Turn Your Passion Into Action — Join Our Team!" • "Join Your Passion. Start Your Journey with Us!" • "Passiona...