Sunday, July 30, 2023

रानभाज्या आणि मिलेट महोत्सवास मुलुंडकरांचा भरघोस प्रतिसाद.


मुलुंड, २९ जुलै २०२३ - मराठमोळं मुलुंड आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी (कोकण) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाज्या आणि मिलेट महोत्सवास मुलुंडकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसले.


            पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत व वेगवेगळी तृणधान्ये (मिलेट), कडधान्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागा बरोबर रानभाज्या व मिलेट महोत्सवाचे आयोजन साल २०21 पासून मुलुंड मध्ये करत असल्याची माहिती मराठमोळ मुलुंड संस्थेच्या अध्यक्ष श्री हेमंत मोरे यावेळी पी.एन.आर. न्युजशी बोलताना दिली.


            मराठमोळं मुलुंड या संस्थेच्या सचिव सौ. प्राची सोमण यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले.  प्रमुख पाहुणे व मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश शिर्के यांनी महोत्सवाचे उद्घाघाटन केले. तसेच विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग माननीय श्री अंकुश माने यांनी रानभाज्यांची संकल्पना व उद्दिष्टे सांगितली.


            मुलुंड विधानसभा संघटक व मुलुंड समाजसेवक अॅड. संजय माळी - स्नेहा केटरर्स अँड डेकोरेटर्स पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन प्रा.लि.लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचे सौजन्य लाभले होते.


            माननीय नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे तसेच माननीय नगरसेवक श्री. प्रभाकर शिंदे आणि माजी नगरसेवक माननीय श्री.नंदकुमार वैती व माजी नगरसेवक माननीय.


श्री. सुनील गंगवानी. उपस्थित होते. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री कांतीलाल दादाराम कोथिंबीरे साहेबही आवर्जून वेळ काढून आले होते.


            मुलुंड पश्चिम येथील मुलुंड हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित या अनोख्या महोत्सवात रानभाज्या, मिलेट, कडधान्ये, आदिवासी हस्तकला, आदिवासी खाद्य पदार्थ आदी विविध वस्तूंची विक्री बरोबरच रानभाज्यांचे शिजवण्याचे मार्गदर्शन, रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मांवर व्याख्याने, आदिवासी लोककला सादरीकरण देखील करण्यात आले होते.

            मराठमोळं मुलुंडचे माननीय अध्यक्ष श्री हेमंत मोरे व त्यांच्या कार्यकारिणी टीमच्या सहकार्याने झालेला हा रानभाज्या मिलेट महोत्सव अतिशय संस्मरणीय झाला.



            श्री. केशव जोशी व सचिव सौ. प्राची सोमण यांनी सूत्रसंचालन सांभाळले. सौ नेहा गोटे यांनी आभार प्रदर्शन केले.


No comments:

Popular Posts

🔥 Special Offers for Advertisers

  🌟 Honoured to Attend | Times Impact Business Seminar 🌟 Had the privilege of attending the Times Impact Business Seminar on Saturday, 2...