Thursday, January 12, 2023

वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृती व चौक सभा

वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृती व चौक सभा कांजुर मार्ग वाहतूक विभागाच्या हद्दित दिनांक.11/01/2023 रोजी 17.00 - 17.45 वाजे चे दरम्यान वाहतूक सुरक्षा सप्ताह 34 अभियानांतर्गत रिक्षा चालक-मालक यांना वाहतूक सुरक्षा संदर्भात जनजागृती व चौक सभा कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन पूर्व पांजी वाडीच्या गेट वर घेण्यात आली. सदर वेळी 60 ते 70 रिक्षा चालक-मालक हजर होते. सदर वेळी वाहतूक विभागाच्या पी आई संपत लोंढे, ए पी आई जितेंद्र पाटील, पी एस आई दत्ताजीराव पवार व हायवे-ऐरोली रायडर तसेच इन्चार्ज हवालदार कुंभार, पोलीस नाईक गीते हे अंमलदार हजर होते त्याच बरोबर युथ ओन मुव या एन जी ओ चे अध्यक्ष रोहित मिश्रा हे त्यांच्या टीम सोबत हजर होते. सदर चौक सभे मध्ये सर्व रिक्षा / टॅक्सी त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्या संदर्भात सूचना/मार्गदर्शन करण्यात आले. 1) मद्यपान करून वाहन चालू नये. 2) मोबाईल फोन चा वापर टाळावा. 3) अति वेगाने व जास्त प्रवासी बसून वाहतूक करू नये. 4) रिक्षा टॅक्सी डबल पार्किंग करू नये. 5) अपघात ग्रस्त वाहन चालकास व प्रवाशास मदत करावी. 6) सीट बेल्ट व हेल्मेट वापर करावा. 7) वाहनावरील प्रलंबित दंड वेळच्या वेळी भरणा करावा. 8) कोणताही वाहन चालक भाडे नाकारणार नाही. असे निदर्शनास आल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 9) वाहन चालवताना नाहक इतर प्रवाशांना त्रास होईल असे वाहन चालू नये. 10) सर्वसामान्य जनतेची सौजन्याने वागावे. 11) सर्व रिक्षा चालक व मालक हे गणवेशात असावे. 12) रिक्षा टॅक्सीचे कागदपत्र जवळ बाळगावे. 13) वाहनांचे परमिट व इतर कागदपत्रे जवळ बाळगावी. 14) कालबाह्य झालेली वाहने चालू नये. 15) प्रामाणिकपणाने प्रवाशाचे सामान परत करावे. 16) रिक्षा व . टॅक्सी चे मीटर मध्ये हेराफेरी करू नये. सदर चा प्रकारात हा दंडणीय अपराध आहे याची जाणीव. अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले सर्व मालक/ चालकांनी वरील सुचना चे पालन करणे बाबत खात्री दिली.

No comments:

Popular Posts