Wednesday, June 29, 2011

महागाईविरोधात मोरचा , Protest against Petrol, Diesel, Gas price hike





























विशेष प्रतिनिधी घरगुती गॅसवर राज्य सरकारनेकर लावलेला नसल्याने गॅसच्यादरात कपात करण्याकरिता करकमी करण्याचा प्रश्नच उद्भभवतनाही , असे सांगणारेउपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितपवार हे महागाईविरोधातीलजनतेच्या असंतोषाचे जनक होऊपाहत आहेत . पवार यांच्या यावर्तनामुळे काँग्रेसचे मंत्री बिथरलेअसून राज्य मंत्रिमंडळाच्याबैठकीत या दादागिरीला आव्हान देण्याची भाषा करीत आहेत .घरगुती गॅसच्या दरात थेट ५० रुपये केंद्र सरकारने वाढवले आहेत . मध्यमवर्गीयांतया दरवाढीबाबत असंतोष असून राज्य सरकार कर कमी करून कसा दिलासा देतेयाकडे लोकांचे लक्ष लागले असतानाच अर्थमंत्री पवार यांनी मागील वर्षी जूनमहिन्यात केंद्राने गॅसचे दर वाढवले तेव्हाही सिलेंडरवर कोणताही कर न लादून२५० कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडल्याचे जाहीर केले . मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीकाँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन घरगुती गॅस स्वस्त करण्याची मागणी केली .राज्य सरकारच्या हातात नसलेली मागणी करून मुख्यमंत्री चव्हाण यांची पंचाईतकरण्याची अर्थमंत्री पवार यांच्या इशाऱ्यावरून खेळलेली ही खेळी असल्याचे मतएका ज्येष्ठ काँग्रेस मंत्र्याने व्यक्त केले .डिझेल व केरोसिनवरील कर काही अंशी कमी केले तरीही त्याचा परिणाम लागलीचजाणवणार नाही कर कपातीनंतरही व्यापारी वर्गाकडून जनतेची लूट सुरूच असते .हळूहळू नवी दरवाढ लोकांच्या अंगवळणी पडल्यावर व्यापारी एकीकडून करकपातीचा लाभ घेतात व दुसरीकडे लोकांकडून दामदुप्पट दर वसूल करतात असाअनुभव आहे घरगुती गॅसचे दर कमी केले तरच लोकांमध्ये सकारात्मक संदेश जातोही बाब हेरून अर्थमंत्री राजकारण खेळत असल्याचे मत प्रदेश काँग्रेसच्यापदाधिकाऱ्याने व्यक्त केले .शरद पवार यांना काँग्रेसने अन्नधान्याची महागाई सडका गहू अतिरिक्त धान्याचेगोरगरीबांना वितरण यासारख्या मुद्द्यांवर एकाकी पाडल्याचा वचपा अजित पवारव राष्ट्रवादी काँग्रेस काढत असली तरी जनतेच्या भावना महागाईने तीव्र असतानासुरू असलेल्या या राजकारणाबाबत मंत्रिमंडळात जाब विचारण्याची तयारी काहीकाँग्रेस मंत्र्यांनी चालविली आहे 

No comments:

Popular Posts

Shop for Rent – Mulund West (Prime Location)

Location Highlights: Road-facing shop in a newly constructed building In a famous society, right next to Apna Bazar & Maharashtra Se...