


































Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small retail counters.खा
sssss..डे दि 'बेस्ट'बेस्ट कर्मचा-यांची एक बेस्ट आयडिया आहे. ते ऑन डयुटी असताना आपले नाव कुणालाही सांगत नाहीत. ते सर्वजन आकडयात बोलतात.म्हणजे नंबरात नावे सांगतात.(यातील बहुतेक कर्मचारी आकडे खेळणारे असतात. कदाचित कंडक्टर असल्याने सातत्याने त्यांच्यावर आकडेमोडीचा परिणाम होत असेल.) सांगावयाचे म्हणजे थांब्या-थांब्यावर तसेच बसमध्ये देखील त्यांची आकडेमोड सुरूचं असते. याचा परिणाम त्यांच्यावर इतका झालाय की, प्रत्येक प्रवाश्यांनी देखील आकडेमोड करीत रहावे असे त्यांना वाटतेय. जे प्रवासी बिच्चारे मुकाटयाने प्रवास करू ईच्छितात त्यांचे सध्या खूपचं वांदे झालेत.उदाहरणार्थ एखाद्या प्रवाश्याने निमूटपणे त्याला हव्या त्या बस थांब्याचे तिकिट त्याने मागितल्यास त्याला सदर थांब्याचे दर माहित हवेत,बेस्टच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास प्रवाश्यास आकडेमोड करता आली पाहिजे.नाहीतर प्रवाश्यास नाहक भुर्दंड पडतोच शिवाय त्याची सर्वांसमोर मानहानी निरीक्षरांकडून केली जाते हे विशेष.
मुलुंड पश्चिमेस नुकतीच अशी एक घटना घडली.समाजात चांगले नाव असलेली एक व्यक्ती तीन-हात नाका ठाणे येथील बस-थांब्यावरून 496 नंबरच्या बसमध्ये चढली. त्यांनी कंडक्टर(15106) कडून निर्मल-लाईफ थांब्याचे तिकिट मागितले. त्याप्रमाणे सदर कंडक्टर(
15106) ने त्या व्यक्तीस तिकिट दिले. काहीवेळाने निर्मल-लाईफ बस-थांबा आल्याने ती व्यक्ती बसमधून उतरली. सदर व्यक्ती थांब्यावर उतरताच बेस्ट निरिक्षक ( बिल्ला क्र.706) यांनी ह्या व्यक्तीकडे तिकिटाची विचारणा केली असता, त्याने त्याच्याजवळील तिकिट दर्शविले. मात्र ( बिल्ला क्र.706) निरीक्षकाने त्या व्यक्तिस थांबवून त्याची उलटतपासणी सुरू केली. तरीदेखील सदर व्यक्तीने आपण तीन-हात नाका ते निर्मल-लाईफ अशा प्रवासाचे तिकिट मागितले होते त्यानुसार कंडक्टर(बिल्ला क्र.15106) ने मला तिकिट दिले. त्यानंतर ( बिल्ला क्र.706) निरीक्षकाने कंडक्टर(बिल्ला क्र.15106) यांस याबाबत विचारले तेंव्हा प्रवासमार्ग बरोबर असून मीच हे तिकीट दिले आहे असे कंडक्टर(बिल्ला क्र.15106)ने सांगितले. मात्र कंडक्टरने योग्य दराचे तिकिट दिले नसल्याचे( बिल्ला क्र.706) निरिक्षकाच्या लक्षात आले. त्याने केवळ कंडक्टरचा नंबर घेतला आणि बस सोडली.ह्या गदारोळात बिच्चा-या प्रवाश्याच्या सुरूवातीस काही लक्षात आले नव्हते पंरतू ( बिल्ला क्र.706) निरिक्षराने सर्वांसमोर त्याचा अपमान तर केलाच शिवाय आपण सुशिक्षित असल्याने प्रत्येक बस-थांब्याचे भाडे आपणास माहित असायला हवे ते माहित नसल्याने आपण गुन्हेगार आहात नशिब तुम्हचे तुम्हांस दंड न भरताच केवळ चार रूपयांचे एक तिकिट घ्यावे लागेल असे फर्मावले.हे ऐकून त्या व्यक्तीने निरिक्षकास सांगितले,'' साहेब आपल्या कंडक्टरने मला चुकीचे तिकिट दिले हा काय माझा गुन्हा आहे काय? तसेच माझी काही एक चुक नसताना तुम्ही उलट मलाचं दम देताय. प्रत्येक प्रवाश्यास हरऐक बस-थांब्याचे भाडेदर माहीत असणे अनिवार्य नाही.'' तरीदेखील ( बिल्ला क्र.706) निरीक्षक ऐकले नाहीत.त्यांनी लोंकासमोर आक्रसताळेपणा सुरूच ठेवला.त्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी योगेश पांडे यांच्याकडे ही बाब नेली असता त्यांनी सदर कंडक्टरची तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला आणि अशा केसमध्ये निरिक्षक किंवा आपण काही करू शकत नाही असे हताशपणे सांगितले.मात्र प्रवाश्यांकडून नाहक दंड वसूली तसेच त्यांची मानहानी बेमालूपणे करण्याचा यांना अधिकार आहे यावरून दिसून आले. ह्या घटनेनंतर ( बिल्ला क्र.706)निरीक्षक आपण एखादे युध्द जिंकल्याच्या त्वेषात निर्मल-लाईफ बस-थांब्यावर वेडेचाळे करीत होते. त्यांचे त्या अवस्थेतील छायाचित्र येथे मुद्दामहून देत आहोत.आजवर बेस्ट प्रशासन कर्मचा-यांवर अन्याय करतेय असे वाटत होते पंरतू ( बिल्ला क्र.706) यांची वर्तणूक पहाता प्रशासन योग्य आहे असे वाटते. सदर घटना छोटी नसल्याने सदर प्रवाशी व्यक्तीने मुंलुड बेस्ट आगारात तक्रारवहीत तक्रार नोंदवलेली आहे.कारण आज शेकडो अडाणी प्रवाशी बसमधून प्रवास करीत आहेत त्यांना भाडेदर माहीत नसते. अशा प्रवाश्यांवर अन्याय होऊ नये असे आपणास वाटते यास्तव तक्रार नोंदविल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.इतकेच नव्हे तर मुंलुंड बेस्ट आगाराचे अधिकारी भिसे .यांनीदेखील आपणास भाडेदर माहित नसल्याचे सांगितले.त्यामुळेच बेस्ट प्रशासन यावर काय निर्णय घेतेय ते कळेलचं नाहीतर या घटनेकडे बेस्ट प्रशासन खाsssss..डे दि 'बेस्ट' डे न समजले म्हणजे झाले. ( बिल्ला क्र.706 निरीक्षक यांचे नाव खाडे असल्याचे कळते.)By Nitin Maniar | Senior Crime Correspondent, Power Publication Studio 08 November 2025 | Mumbai A senior citizen’s family from Mulund ...