Thursday, January 23, 2025

मुलुंडमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला, पोलीस ओळख पटवण्यासाठी मदतीचे आवाहन

 


मुलुंड १७ – ०१ – २०२५ : मुलुंड पश्चिम येथील कृष्णा मेटल शॉप, शांती बिल्डिंगसमोर, ३९६ अंधेरी बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर, एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह २४ डिसेंबर २०२४ रोजी आढळून आला असून, याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद क्रमांक - १६५/२०२४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
मयत व्यक्तीचे वर्णन:
अंदाजे वय: ३५ ते ३८ वर्षे
चेहरा: उभट
रंग: सावळा
केस: काळे व वाढलेले
उंची: सुमारे ५ फूट २ इंच, सडपातळ बांधा
नेसणी: हिरव्या रंगाचे हाफ बाह्यांचे टी-शर्ट आणि बॉटल ग्रीन रंगाची पँट
पोलीस या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर कोणी या व्यक्तीला ओळखत असेल किंवा त्याच्याबद्दल कोणतीही माहिती असेल, तर त्यांनी कृपया महेश बने, पोलीस उपनिरीक्षक, मुलुंड पोलीस ठाणे यांच्याशी ०२२-२५६८४५३५ किंवा ८०८२७५७८३२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांच्या सहकार्यामुळे या अज्ञात व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधणे आणि त्यांना योग्य माहिती देणे शक्य होईल.


Popular Posts

• "Turn Your Passion Into Action — Join Our Team!"

  • "Turn Your Passion Into Action — Join Our Team!" • "Join Your Passion. Start Your Journey with Us!" • "Passiona...