Saturday, April 15, 2023

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मुलुंडला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आज विश्र्वभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, मुंबईच्या मुलुंड उपनगरात सुध्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुलुंड येथे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने 14 एप्रिल 2023 रोजी बाबासाहेबांना सामुहिक वंदन करण्यात आले.
मुलुंड पशचिमेला एस.वि.पी रोड मुलुंड स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री कांतीलाल दादाराम कोथिंबीरे साहेब तसेच पोलीस सब इन्स्पेक्टर मा. श्री मुकेश घोलप साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होतो व व.पो.नी. कोथिंबीरे साहेबांच्या हस्ते अल्पोपाहार वाटप करण्यात आला. आयोजक म्हणून आनंद साबळे प्रदेश सरचिटणीस (भाजप अ.जा.मोर्चा ), नितीन आहेर, अनिल भाई, हरिवंशराय मौर्य, संजय दुबे, अविनाश साबळे, ओसामा अन्सारी, प्रकाश जाधव, जगन्नाथ लोखंडे , ईत्यादी उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते.

Popular Posts

MICCHAMI DUKKADAM

Before Paryushan, Jains engage in a practice called Pratikraman, which involves introspection, repentance, and seeking forgivene...