Friday, November 14, 2014
Thursday, November 13, 2014
Monday, November 10, 2014
Mumbai North East Suburban journalist Protest against javkheda murder mistry
जवखेडा तिहेरी हत्याकांडाच्या
निषेधार्थ पत्रकार आणि वार्ताहरांचे एक
दिवसीय लाक्षणिक उपोषण.
मुलुंड : मानवतेला काळिमा फासणा-या आणि उभ्या पुरोगामी
महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारे हत्याकांड म्हणजे अहमदनगर
जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी हत्याकांड आहे. या निर्घृण हत्याकांडाचा
उपनगरातील सर्व पत्रकार-वार्ताहर यांनी एकत्र येवून आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
केले. तहसिलदार, कुर्ला
यांच्याद्वारे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. आणि या प्रकरणात जलदगतीने कारवाई करून आरोपींना
अटक करण्यात यावी अशी एकमुखी मागणी या पत्रकारांनी केली. त्याचबरोबर तपास योग्य
पद्धतीने अथवा दबावा मुळे होत नसेल तर तो तातडीने सीबीआय कडे देण्यात यावा. अशी
विंनती पत्रकारांनी केली आहे.
महाराष्ट्रात विविध कायदे असूनही धाक उरलेला नाही.
जातपात,उच्चनिच्च या भेदभावावर आधारित सामान्य नागरिकांचे दमन
करण्याचे प्रकार चालू आहेत. समाजात सौदार्हपूर्ण वातावरण निर्माण व्हावे याकरिता
सामाजिक समरसता जोपासली जावी यासाठी विशेष उपक्रम राबवले जावेत. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी
या प्रकरणी विशेष प्रयत्न करावेत.अशी भावना या पत्रकारांनी व्यक्त केली.
पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होईल
आणि आणि समाजातील सर्व घटकांना न्याय आणि सुरक्षेची हमी मिळेल अशा त-हेची पावले
नव्या दमाने लवकर उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. जाधव
कुटुंबियांना आपण लवकरात लवकर न्याय द्वावा अशी मागणी आम्ही सर्व पत्रकार, वार्ताहर
आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी केली.
प्रफुल कांबळे, नितीन मणियार, विनायक सुतार, आनंद
पारगावकर, सुप्रिया मोरे, दिपाली साळवी, एस एम कबीर, मिहीर जोशी आणि त्याचबरोबर
इतर सर्व पत्रकार वार्ताहर आणि सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते यांनी उपोषणात सहभाग
घेतला.
प्रफुल्ल कांबळे नितीन मणियार विनायक सुतार
आनंद पारगावकर
युवा प्रभाव
पीएनआर न्यूज लोकमार्ग स्वतंत्र माहितीचा अधिकार
(976800249) (9768006860) (9869856555) (9769103056)
सुप्रिया मोरे एस एम कबीर दीपाली साळवी
पत्रकार प्रेस फोटोग्राफर पत्रकार
(9773563273) (9867866021) (9892368696)
Sunday, November 9, 2014
मानवतेला काळिमा फासणारे, अहमदनगर जिल्हातील जवखेडा गावातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ उपनगरातील सर्व पत्रकार आणि वार्ताहरांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
मुलुंड : मानवतेला काळिमा फासणा-या आणि उभ्या पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारे हत्याकांड म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी हत्याकांड आहे. या निर्घृण हत्याकांडाचा आम्ही उपनगरातील सर्व पत्रकार-वार्ताहर निषेध करीत आहोत. याकरीता आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषणानंतर मा. तहसिलदार, कुर्ला यांच्याद्वारे सदरहू निवेदनाद्वारे खालील मुद्दे उपस्थित करीत असून राज्याचे मुख्यमंत्री आणि कुटुंबप्रमुख या नात्याने त्याचा प्रत्यक्षात विचार करावा आणि जलदगतीने कारवाई करावी.अशी विनंती करणार मुख्यमंत्र्यांना करणार आहोत .
१) जवखेडातील दलित कुटुंब जाधव यांच्या तिहेरी हत्याकांड प्रकऱणी आरोपींना तातडीने अटक करावी.
२) आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा.
३) १५ दिवसानंतरही तपासात प्रगती होत नसल्याने ह्या हत्त्याकांडाचा तपास सीबीआय कडे सुपूर्द करावा.
४) राज्यात आजही उच्च-निच्च विकृत विचारांवर आधारित जनसामान्यावर अन्याय अत्याचार होत असून विविध कायदे असूनही धाक उरलेला नाही. जातपात,उच्चनिच्च या भेदभावावर आधारित सामान्य नागरिकांचे दमन करण्याचे प्रकार चालू आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून आपण या प्रकरणी विशेष प्रयत्न करावेत.
५) समाजात सौदार्हपूर्ण वातावरण निर्माण व्हावे याकरिता सामाजिक समरसता जोपासली जावी यासाठी विशेष उपक्रम राबवले जावेत .
पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होईल आणि आणि समाजातील सर्व घटकांना न्याय आणि सुरक्षेची हमी मिळेल अशा त-हेची पावले नव्या दमाने लवकर उचलावीत अशी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडे विनंती करीत आहोत. जाधव कुटुंबियांना आपण लवकरात लवकर न्याय द्वावा अशी मागणी आम्ही सर्व पत्रकार, वार्ताहर आणि सामाजिक कार्यकर्ते करणार आहोत .
धन्यवाद.
प्रफुल्ल कांबळे नितीन मणियार विनायक सुतार आनंद पारगावकर
युवा प्रभाव पीएनआर न्यूज लोकमार्ग स्वतंत्र माहितीचा अधिकार
(976800249) (9768006860) (9869856555) (9769103056)
सुप्रिया मोरे एस एम कबीर दीपाली साळवी
पत्रकार प्रेस फोटोग्राफर पत्रकार
(9773563273) (9867866021) (9892368696)
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...