Friday, July 4, 2008

इमान आज भी बाकी है दोस्त




पैसा आणि सोन्याचा मोह कुणालाही सुटत नाही. आजच्या कलियुगात तर अशा मोहापासून दूर रहाणे जरा मुष्कीलचं म्हणावे लागेल. पंरतू याच दुनियेत याला देखील काहीजन अपवाद आहेत. मुलुंड शहरात या अपवादास साजेशी एक घटना घडल्याचे वृत्त आहे. मुलुंड पश्चिमेस स्टेशनजवळ असलेल्या रिक्शा-युनियन कार्यालयात पी मोगेश्वरी नाडर नावाची महिला रडवलेल्या स्थितीत एक तक्रार नोंदविण्यासाठी आली होती. वीस हजार रोख रक्कम आणि तब्बल नऊ तोळे सोने असलेली तिची बॅग घर ते मुलुंड पर्यंत रिक्शा-प्रवास करताना हरविल्याची तिने तक्रार केली होती. युलियन लिडर प्रकाश राऊत यांनी पी नाडर हीची तक्रार नोंदवून घेतली मात्र बॅगेतील ऐवज पहाता सदर बॅग मिळणे मुष्कीलच वाटत होते. इकडे रिक्शा क्रमांक MH03 J 2956 चा चालक दिपक शंकर जाधव स्टेशनचे भाडे सोडून रिक्शाचे थोडे काम करण्यासाठी गॅरेजमध्ये गेला असताना त्याला त्याच्या रिक्शात एक बॅग दिसली. त्यातील ऐवज पाहिल्यानंतर त्याच्यातील चांगला माणूस जागा झाला, त्याने त्या बॅगेसहीत रिक्शा युनियन कार्यालयात नेली. दिपक जाधवची ईमानदारी पाहून युनियन लिडरने रीक्शाचालक जाधवची पाठ थोपटली. तसेच नंतर त्याने दिपक जाधव, बॅगेच्या मालक पी मोगेश्वरी नाडरबाई यांना घेऊन मुलुंड पोलिस ठाण्यात नेले.तिथे व.पो.नि. प्रकाश लांडगे यांच्यासमोर सदर पैसे आणि सोने असलेली बॅग पी. नाडर यांना सुर्पुद केली. आजच्या कलियुगात सर्वात बदनाम असलेल्या रिक्शावाल्यांमध्ये दिपक जाधव सारखे ईमानी रिक्शाचालकांमुळे ईमान अभी बाकी है दोस्त .....असेच म्हणावे लागेल. सध्या दिपक जाधवच्या ईमानदारीची चर्चा मुलुंडमध्ये जोरात सुरू आहे.



Popular Posts