Friday, May 17, 2024

मोदीच्या राज्यात जीवांची गॅरंटी शुन्य

 मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – मोदी की गॅरंटी, म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या राज्यात लोकांच्या जीवांची कोणतीही गॅरंटी राहिली नाही. मोदी की झिरो गॅरंटी, अशी म्हणण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर आली आहे, अशी घणाघाती टीका ईशान्य मुंबईतील मतदारांनी केली आहे.

 केवळ मतांसाठी मुंबईत आलेल्या नरेंद्र मोदी यांना मुंबईकरांची काळजी नसल्याचे दिसून आले आहे. घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू तर 70 हुन अधिक नागरिक जखमी झाले असतानाही नरेंद्र मोदी यांना जखमींना हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटण्यास वेळ मिळाला नाही. सतत राजकारण करणा-या मोदींनी केवळ रोड शो करीत मतांचा जोगवा मागण्यात धन्यता मानली, असा आरोप ईशान्य मुंबईतील मतदारांनी केला.

 ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भाजपा समोर कडवे आव्हान उभे केल्याने ईशान्य मुंबईची जागा गमवावी लागण्याचे चिन्ह आता भाजपाला दिसू लागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या भाजपाने थेट काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रचारासाठी रस्त्यावर आणले. माझा देश माझा परिवार असा नारा देणा-या पंतप्रधानांना अपघातग्रस्तांचा परिवार हा आपला वाटला नाही. मोदी की गॅरेन्टी देणारा भाजप आज लोकांच्या जीवाची गॅरेन्टी देत नाही. असा आरोप ईशान्य मुंबईतील नागरिकांनी केला आहे

 काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तवर गांधीनगर, घाटकोपर भागाला जोडणारे सर्व रस्ते बंद केले होते. सर्व वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने फिरविल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. यावर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

No comments:

Popular Posts

On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.

  On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.  His teachings  emphasize the importance of s...